Stock Market | गुंतवणूकदारांना छप्परफाड रिटर्न ! ‘या’ कंपनीचा 10 पैशाचा शेअर गेला 571 रुपयांवर, 10 हजाराचे झाले 5 कोटी

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – शेअर मार्केटमध्ये (Stock Market) गुंतवणूक (Investment) करणाऱ्यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. अनेकांना झटपट चांगला परतावा मिळावा अशी इच्छा असते. मात्र, शेअर मार्केटमध्ये (Stock Market) संयम हा महत्त्वाचा असतो, असा सल्ला सल्लागार देत असतात. सध्याच्या घडीला शेअर मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात चढ – उतार पाहायला मिळत आहे. आठवड्यात कमी झालेले खनिज तेलाचे दर (Crude Oil Prices), परकीय वित्तसंस्थांकडून झालेली खरेदी यामुळे शेअर बाजारात चांगली वाढ झाल्याचे पहायला मिळत आहे. शेअर बाजाराचे निर्देशांक वाढल्याने गुंतवणूकदारांची श्रीमंती वाढली आहे.

 

शेअर बाजाराचे (Stock Market) भांडवल मूल्य 71,929.24 कोटी रुपयांनी वाढून 2,60,37,730.78 कोटी रुपयांवर पोहोचले आहे.
यामुळे गुंतवणूकदारांच्या उत्साहाला उधाण येणार आहे.
यात काही कंपन्या दमदार कामगिरी करत असून गुंतवणूकदारांच्या वाढत्या विश्वासामुळे काही वर्षात चांगले रिटर्न (Returns) मिळत आहेत.

 

GRM Overseas ही कंपनी शेअर बाजारात धमाल कामगिरी करत आहे. 1 एप्रिल 2004 रोजी या कंपनीच्या शेअरची किंमत फक्त 10 पैसे होती. परंतु 17 मार्च 2022 रोजी याच कंपनीच्या शेअरची किंमत (Share Price) तब्बल 571 रुपयांवर पोहचली आहे. याचाच अर्थ GRM Overseas कंपनीने सुमारे 18 वर्षामध्ये गुंतवणूकदारांना तब्बल 5.71 लाख टक्क्यांचे बंपर रिटर्न दिल्याचे सांगितले जात आहे. या कंपनीचा ट्रॅक रेकॉर्डही (Track Record) चांगला असल्याचे म्हटले जात आहे. 23 मार्च 2012 रोजी या कंपनीचा शेअर 1.85 रुपयांवर होता.

 

GRM Overseas कंपनीच्या शेअरची किंमत 10 वर्षानंतर 571.95 एवढी झाली आहे.
गेल्या 10 वर्षात कंपनीने गुंतवणूकदारांना 30,816 टक्के रिटर्न दिल्याचे सांगितले जात आहे.
गेल्या 5 वर्षांचा विचार करता, GRM Overseas कंपनीने गुंतवणूकदारांना 9,545 टक्क्यांचा परतावा दिला आहे.

GRM Overseas च्या गुंतवणूकदारांची छप्पर फाड कमाई झाली आहे.
जर एखाद्याने कंपनीच्या शेअरची किंमत 10 पैसे असताना 10 हजार रुपयांची गुंतवणूक केली असेल, तर 18 वर्षांच्या कालावधीनंतर या गुंतवणूकदाराला तब्बल 5 कोटी 72 लाख रुपये मिळाले असते, असे सांगितले जात आहे.
जर 1 लाख रुपये गुंतवले असते तर आता त्याचे 57 कोटी रुपये झाले असते.
याच क्रमाने 1 हजार गुंतवले असते तर 57 लाख मिळाले असते.

 

GRM Overseas कंपनीची स्थापना 1974 मध्ये झाली होती. जगभरातील देशांमध्ये तांदूळ निर्यातीचे (Rice Export) काम ही कंपनी करते.
कंपनीचा आतापर्यंत प्रवास खूप मोठा आणि प्रगतीकारक राहिला असल्याचे सांगण्यात येत आहे.

 

(डिस्क्लेमर : – याठिकाणी केवळ शेअरच्या परफॉर्मन्सची माहिती (Share Performance Information) दिली आहे. हा गुंतवणुकीचा सल्ला नसून शेअर मार्केटममधील (Stock Market) गुंतवणूक ही जोखमीवर अवलंबून असते. त्यामुळे गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आणि मार्गदर्शन घेणे आवश्यक आहे. येथे दिलेला मजकूर केवळ माहितीच्या हेतूने दिलेला आहे. www.policenama.com कडून कुणालाही पैसे लावण्याचा कधीही सल्ला दिला जात नाही.)

 

Web Title :- Stock Market | grm overseas penny stock has made 5 crore of rs 10 thousand investment know all details

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा