Stock Market Holidays | ‘या’ महिन्यात NSE, BSE किती दिवस बंद राहणार, चेक करा पूर्ण लिस्ट

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Stock Market Holidays | ऑगस्ट महिना सुट्टीसाठी खास असतो. या महिन्यात अनेक मोठे सण येतात. त्यामुळे या महिन्यातही शेअर बाजारात अनेक दिवस सुट्टी असणार आहे. ऑगस्ट 2022 मध्ये, BSE आणि NSE वरील ट्रेडिंग 9 ऑगस्ट, 15 ऑगस्ट आणि 31 ऑगस्ट असे तीन दिवसांसाठी बंद राहील. 9 ऑगस्ट 2022 रोजी मोहरम असल्याने दलाल स्ट्रीटवर कोणतेही व्यवहार होणार नाहीत. तसेच 15 ऑगस्टला स्वातंत्र्य दिनानिमित्त बाजारपेठ बंद राहणार आहे. महिनाअखेरीस 31 ऑगस्टला येणार्‍या गणेश चतुर्थीनिमित्त शेअर बाजार बंद राहील. (Stock Market Holidays)

 

तुम्ही बीएसईच्या अधिकृत वेबसाइट bseindia.com वर स्टॉक मार्केट हॉलिडे 2022 ची संपूर्ण यादी तपासू शकता. ऑगस्ट 2022 मध्ये या तीन दिवसांमध्ये इक्विटी विभाग, इक्विटी डेरिव्हेटिव्ह सेगमेंट आणि एसएलबी सेगमेंटमध्ये कोणतीही खरेदी/विक्री होणार नाही. (Stock Market Holidays)

 

ऑगस्टची सुट्टी

ऑगस्ट 2022 मधील शेअर बाजाराच्या सुट्ट्यांच्या यादीनुसार, बाजार 9 आणि 31 तारखेच्या सुट्टीच्या दिवशी संध्याकाळच्या सत्रात उघडेल. साधारणपणे बाजार सकाळी 9:00 ते संध्याकाळी 5:00 पर्यंत खुला असतो. त्याच वेळी, कमोडिटी विभागातील व्यवहार 15 ऑगस्ट 2022 रोजी सकाळ आणि संध्याकाळच्या दोन्ही सत्रांमध्ये निलंबित राहील.

 

ऑक्टोबरमध्येही बाजार तीन दिवस बंद

31 ऑगस्ट 2022 नंतर, पुढील शेअर बाजाराची सुट्टी 5 ऑक्टोबर 2022 रोजी दसरा सणासाठी आहे.
यानंतर 24 ऑक्टोबर 2022 आणि 26 ऑक्टोबर 2022 रोजी दिवाळी आणि बलिप्रतिपदेला सुट्टी असेल.
त्याचबरोबर सप्टेंबर महिन्यात शेअर बाजाराला कोणतीही सुट्टी नसेल. त्याच वेळी, ऑक्टोबर 2022 मध्ये शेअर बाजाराला तीन सुट्ट्या असतील.

 

ऑगस्टमध्ये अनेक मोठे उत्सव असतात. उदाहरणार्थ, मोहरम (Muharram), रक्षाबंधन (Raksha Bandhan),
स्वातंत्र्य दिन (Independence Day), कृष्ण जन्माष्टमी (Janmashtami) आणि गणेश चतुर्थी (Ganesh Chaturthi)
असे अनेक सण आहेत, ज्यादिवशी बँकांचे कामकाज होणार नाही.

 

Web Title : – Stock Market Holidays | stock market holidays how many days will nse bse be closed this month check list

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा