Stock Market Investment Tips | जीवनात रंग भरणारे आहेत ‘हे’ 5 स्टॉक्स, होत राहील मोठी कमाई !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Stock Market Investment Tips | दरवर्षी होळी (Holi) हा रंगांचा सण देशभरात आनंदाने आणि उत्साहात साजरा केला जातो. या सणानिमित्त लोक एकमेकांना सुख आणि समृद्धीच्या शुभेच्छा देतात. प्रत्येकाच्या आयुष्यात रंग भरणार्‍या या सणाच्या दिवशी, आम्ही तज्ञांनी शिफारस केलेल्या अशा काही स्टॉक्सबद्दल सांगणार आहोत, जे तुम्हाला दीर्घकाळासाठी चांगला रिटर्न (Top Share) देणारे ठरू शकतात. यामुळे आगामी काळात तुमच्या कुटुंबात अधिक समृद्धी येईल. (Stock Market Investment Tips)

 

1. Tata Motors :
हा टाटा समूहाचा शेअर आहे. CNI Research चे CMD किशोर ओसवाल (Kishor Ostwal) म्हणाले की, पुढील एक वर्ष आणि दीर्घ कालावधी लक्षात घेता, असे म्हणता येईल की हा स्टॉक गुंतवणूकदारांना चांगला रिटर्न देणारा ठरेल. याचे कारण असे की, गेल्या काही वर्षांत टाटा मोटर्सने अतिशय आक्रमक पद्धतीने नवीन वाहने बाजारात आणली आहेत आणि बाजारातील प्रत्येक सेगमेंटला लक्ष्य केले आहे.

Tata Motors Share Price :
गुरुवारी सकाळी 11:18 वाजता कंपनीच्या शेअरची किंमत एनएसईवर 432.75 रुपये होती. कंपनीच्या स्टॉकच्या 52 आठवड्यांच्या उच्चांकाबाबत बोलायचे तर हा स्टॉक 536.70 रुपयांच्या पातळीवर गेला आहे. (Stock Market Investment Tips)

 

2. Vipul Organics Ltd :
ही एक रासायनिक कंपनी आहे. ओसवाल यांच्या मते हा स्टॉक आगामी काळात चांगली कामगिरी करू शकतो. या स्टॉकची किंमत (Vipul Organics Share Price) गुरुवारी सकाळी 11:26 वाजता 214.85 रुपये होती. या शेअरचा 52 आठवड्यांचा उच्चांक 245 रुपये आहे.

 

3. Reliance industries :
SMC Global Securities Ltd. चे सहाय्यक उपाध्यक्ष, संशोधन (रिटेल इक्विटीज), सौरभ जैन – यांनी या स्टॉकवर डाव लावला आहे. मार्केट कॅपच्या बाबतीत रिलायन्स इंडस्ट्रीज ही देशातील सर्वात मोठी कंपनी आहे. सकाळी 11:45 वाजता कंपनीचा शेअर (Reliance Industries Share Price) 2,440.30 रुपयांवर ट्रेड करत होता.

4. ICICI Bank :
ही देशातील अग्रगण्य खाजगी क्षेत्रातील बँकांपैकी एक आहे. सर्व विश्लेषकांना या शेअरबद्दल पूर्ण विश्वास वाटत आहे. जैन यांनी दीर्घकाळासाठी त्यांच्या प्रमुख निवडीतही त्याचा समावेश केला आहे. सकाळी 11:48 वाजता या शेअरची किंमत (ICICI Bank Share Price) 720.55 रुपये होती. या शेअरच्या 52 आठवड्यांच्या उच्च पातळीबद्दल बोलायचे तर, एकवेळ हा शेअर रु. 859.70 च्या पातळीवर गेला आहे. (Share Market Marathi News)

 

5. DLF :
बाजारातील रिकव्हरीमुळे रिअल इस्टेट क्षेत्रात तेजी अपेक्षित आहे. जाणकारांच्या मते हा स्टॉक आगामी काळात जोरदार कामगिरी करू शकतो. जैन यांनीही या शेअरवर डाव लावला. गुरुवारी, सकाळी 11:50 वाजता, कंपनीच्या शेअरची किंमत (DLF Share Price) 362.30 रुपयांवर ट्रेड करत होती. (Top Share in 2022)

 

डिस्क्लेमर : (येथे दिलेला मजकूर केवळ माहितीच्या हेतूने दिलेला आहे. येथे सांगणे आवश्यक आहे की, मार्केटमधील गुंतवणूक बाजार जोखमीच्या अधीन आहे. गुंतवणुकदार म्हणून पैसे लावण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्या. www.policenama.com कडून कुणालाही पैसे लावण्याचा कधीही सल्ला दिला जात नाही.)

 

Web Title :- Stock Market Investment Tips | top 5 stocks for next one year reliance industries icici bank and others

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा