शेअर बाजाराने केला नवा रेकॉर्ड ! सेन्सेक्स 445 आणि निफ्टी 128 अंकाने उसळला; गुंतवणूकदारांनी कमावले 1.51 लाख कोटी रुपये

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन  –   परदेशी गुंतवणूकदारांकडून जारी असलेल्या खरेदीमुळे स्थानिक शेअर बाजार नव्या शिखरावर पोहाेचला आहे. बीएसईचा 30 शेअरचा प्रमुख इंडेक्स सेन्सेक्स 445 अंकाने वाढून 44523 च्या विक्रमी स्तरावर बंद झाला, तर एनएसईचा 50 शेअरचा प्रमुख इंडेक्स निफ्टी 128 अंकाच्या वाढीसह पहिल्यांदा 13000 च्या वर बंद झाला. एक्सपर्ट्सचे म्हणणे आहे की, बँक, फायनान्स शेअर्समध्येसुद्धा जोरदार खरेदी झाली. ऑटो शेअरनेसुद्धा वेग पकडला आहे. ऑटो इंडेक्स 19 महिन्याच्या उंचीवर पोहाेचला आहे, तर रियल्टी आणि एफएमसीजी शेअर्समध्येसुद्धा चमक परतली आहे.

का आली शेअर बाजारात तेजी

एसकोर्ट सिक्युरिटीचे रिसर्च हेड आसिफ इकबाल यांनी न्यूज18 ला सांगितले की, शेअर बाजारात तेजीचे कारण एफआयआय म्हणजे परदेशी गुंतवणूकदारांकडून जारी असलेली खरेदी आहे. सोबतच कोरोना वॅक्सीनबाबत येणार्‍या चांगल्या बातम्यांनी बाजारात उत्साह भरण्याचे काम केले आहे. यामुळे जगभरात आर्थिक रिकव्हरीची आशा वाढली आहे.

आता काय करावे गुंतवणूकदारांनी

जॅफरीजने अ‍ॅक्सिस बँकेवर खरेदीचा सल्ला दिला आहे आणि लक्ष्य 610 रुपयांनी वाढवून 700 रुपये ठरवले आहे. त्यांचे म्हणणे आहे की, आर्थिक वर्ष 2022 पासून कमाईत सुधारणेची आशा आहे. मात्र, डीबीएस-एलव्हीबीच्या मर्जरने कॉम्पिटेशन वाढेल.

जॅफरीजने आयसीआयसीआय बँकेवर खरेदीचा सल्ला दिला आहे आणि शेअर 530 रुपयांनी वाढवून 570 रुपये ठरवला आहे. त्यांचे म्हणणे आहे की, आर्थिक वर्ष 2022 पासून क्रेडिट कॉस्ट सुधारण्याची मॅनेजमेंटची आशा आहे. बँकेला चांगले भांडवल आणि सीएएसएने लोन ग्रोथला सपोर्ट मिळेल.

सीएलएसएने एचडीएफसी बँकेवर खरेदीचा सल्ला दिला आहे आणि लक्ष्य 1525 रुपयांनी वाढवून 1700 रुपये ठरवले आहे. त्यांचे म्हणणे आहे की, ती बँकिेंग सेक्टरमध्ये टॉप पिकमध्ये सहभागी आहे.