Stock Market | Reliance चे गुंतवणुकदार झाले मालामाल, एका आठवड्यात इतक्या कोटीचा झाला फायदा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Stock Market | शेअर्स (Stocks) मध्ये वाढ झाल्यामुळे गेल्या आठवड्यात Top-10 Firms पैकी नऊ कंपन्या नफ्यात राहिल्या. या कंपन्यांच्या एकूण (Market Cap) मध्ये 2.98 लाख कोटी रुपयांची वाढ झाली आहे. मुकेश अंबानी यांच्या नेतृत्वाखालील रिलायन्स इंडस्ट्रीज (Reliance Industries) आणि टाटा ग्रुपची टीसीएस (TCS) नफा कमावणार्‍या कंपन्यांमध्ये आघाडीवर होत्या. (Stock Market)

 

सेन्सेक्स 4 टक्क्यांहून जास्त वाढला
एलआयसी (LIC) वगळता, एचडीएफसी बँक, इन्फोसिस, हिंदुस्तान युनिलिव्हर लिमिटेड आणि आयसीआयसीआय बँकसह प्रमुख 9 कंपन्यांनी त्यांच्या मार्केट कॅपिटलायजेशन (MCap) मध्ये एकूण रु. 2,98,523.01 कोटींचा समावेश केला. मागील आठवड्यात, बॉम्बे स्टॉक एक्स्चेंज (बीएसई) च्या 30 शेअर्सचा बेंचमार्क सेन्सेक्स (Sensex) 2,311.45 अंकांनी किंवा 4.29 टक्क्यांनी वाढला होता. (Stock Market)

 

रिलायन्सला झाला जबरदस्त नफा
रिलायन्स इंडस्ट्रीज (Reliance Industries) चे मार्केट कॅपिटलायजेशन शुक्रवारी आठवड्याच्या शेवटच्या व्यवहाराच्या दिवशी 16,93,245.73 कोटी रुपये झाले. आकडेवारीनुसार, रिलायन्स गुंतवणूकदारांच्या मालमत्तेत सुमारे 68,564.65 कोटी रुपयांची वाढ झाली आहे. याशिवाय देशातील सर्वात मोठी टेक कंपनी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (टीसीएस) चा मार्केट कॅप 64,929.87 कोटी रुपयांनी वाढून 11,60,285.19 कोटी रुपयांवर पोहोचला आहे.

 

या कंपन्यांचे गुंतवणूकदार मालामाल
रिलायन्स आणि टीसीएस व्यतिरिक्त, आयसीआयसीआय बँकेचे (ICICI Bank) मार्केट कॅप 34,028.7 कोटी रुपयांनी वाढून 5,56,526.81 कोटी रुपये झाले. इन्फोसिस (Infosys) चे एम-कॅप 31,893.77 कोटी रुपयांनी वाढून 6,33,793.91 कोटी रुपये झाले. याशिवाय स्टेट बँक ऑफ इंडियाचे (SBI) बाजार भांडवलही 30,968.4 कोटी रुपयांनी वाढून 4,58,457.30 कोटी रुपयांवर पोहोचले आहे.

बजाज फायनान्सचे एमकॅप वाढले
इतर फायद्यातील कंपन्यांवर नजर टाकल्यास, बजाज फायनान्स (Bajaj Finance) चे बाजार भांडवल 20,636.69 कोटी रुपयांनी वाढून 3,78,774.69 कोटी रुपये झाले, तर हिंदुस्तान युनिलिव्हर (HUL) चे बाजार भांडवल 16,811.32 कोटी रुपयांनी वाढून 6,20,362.58 कोटी रुपये झाले.

 

एचडीएफसी बँके (HDFC Bank) ची मार्केट व्हॅल्यू रु. 16,110.37 कोटींनी वाढून रु. 7,73,770.09 कोटी झाली. दुसरीकडे, एचडीएफसीचे एम-कॅप 14,579.24 कोटी रुपयांनी वाढून 4,16,701.23 कोटी रुपये झाले.

 

LIC ला 12000 कोटींचा तोटा
मागील आठवड्यात तोट्यात असलेली BSE ची एकमेव कंपनी एलआयसीचे मार्केट कॅप (LIC MCap)
12,396.99 कोटी रुपयांनी कमी होऊन 4,35,760.72 कोटी रुपयांवर आले.
टॉप 10 कंपन्यांच्या क्रमवारीत रिलायन्स इंडस्ट्रीज ही सर्वात मौल्यवान कंपनी होती.
त्यानंतर टीसीएस, एचडीएफसी बँक, इन्फोसिस, हिंदुस्थान युनिलिव्हर, आयसीआयसीआय बँक,
स्टेट बँक ऑफ इंडिया, एलआयसी आणि बजाज फायनान्स यांचा क्रमांक लागतो.

 

Web Title :- Stock Market | mcap of nine of top 10 firms jumps last week ril and tcs lead gainers

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Smriti Irani | ‘बार’वरून स्मृती इराणींच्या वकिलाने काँग्रेसला पाठविली कायदेशीर नोटीस

 

Sandipan Bhumare | ‘शहाणपणा करु नको, तू ये मग दाखवतो’ ! संदिपान भुमरे आणि शिवसैनिकाची Audio Clip व्हायरल

 

MTNL Prepaid Plan | अवघ्या 47 रुपयात 90 दिवसापर्यंत चालू राहील सिम, सोबत मिळतील 500 SMS, पहात राहीले Jio-Airtel-Vi!