Stock Market | अशाप्रकारच्या पेनी स्टॉकमध्ये कधीही करू नका गुंतवणूक, बनवतील कंगाल; असे रहा सतर्क

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Stock Market | जर तुम्हीही शेअर बाजारात गुंतवणूक करत असाल तर तुम्ही सावधगिरी बाळगली पाहिजे, कारण असे अनेक शेअर्स आहेत, ज्यात पैसे गुंतवून तुम्ही कंगाल होऊ शकता, किंवा त्यात पैसे गुंतवून तुम्ही प्रचंड तोट्यात जाऊ शकता. यासारख्या स्टॉकमध्ये गुंतवणुकीबद्दल सेबीनेही (SEBI) गुंतवणूकदारांना सावध केले आहे. (Stock Market)

 

शेअर बाजार तज्ञ आणि व्हॅल्यू रिसर्चचे सीईओ धीरेंद्र कुमार म्हणतात की बनावट शेअर बाजार सल्लागार लोकांना एक मोठे आमिष दाखवतात की 1 रुपया किंवा 50 पैशांचे शेअर्स वेगाने उसळी घेतील आणि एक ते दोन महिन्यांत जोरदार रिटर्न देतील. मात्र शेअर बाजारात हे शेअर्स वाढण्याची शक्यता नसते, कारण त्या कंपनीचा स्टॉक कधीतरी आलेला असतो आणि आता तिचा व्यवसाय बंद पडलेला असतो.

 

अशा शेअर्समध्ये कधीही करू नका गुंतवणूक
धीरेंद्र स्पष्ट करतात की, असे जुने शेअर्स बनावट सल्लागारांकडे पडून आहेत, ज्यांचा व्यवसाय ठप्प झाला आहे आणि ते शेअर मार्केटमध्ये पुढे जाऊ शकत नाहीत. अशा परिस्थितीत, बनावट सल्लागार लोकांना असे स्टॉक खरेदी करण्यास सांगतात.

त्याचवेळी अवघ्या काही महिन्यांत त्यांना लाखो कोटी रुपये मिळतील, असे आमिष दाखवतात. मात्र, असे शेअर्स खरेदी केल्यानंतर गुंतवणूकदारांचे पैसे बुडतात. बनावट सल्लागार सोशल मीडिया, फोन किंवा एसएमएसद्वारे गुंतवणुकीचा सल्ला देतात.

यामागे त्यांचा फायदा काय ?
बनावट सल्लागारांनी असे स्टॉक कमी पैशात विकत घेतलेले असतात आणि विकण्यासाठी चुकीचा प्रचार करतात आणि जेव्हा लोक ते खरेदी करू लागतात तेव्हा या स्टॉकची किंमत वाढते, परंतु जेव्हा या सल्लागारांकडून विकले जातात तेव्हा त्याच्या किंमती झपाट्याने खाली येतात. (Stock Market)

 

ही आहेत काही उदाहरणे
असेच एक उदाहरण म्हणजे इन्व्हेंचर ग्रोथ अँड सिक्युरिटी ज्यामध्ये काही सल्लागारांनी डिसेंबरमध्ये गुंतवणुकीसाठी सांगितले होते, त्यानंतर पुढील महिन्यात ते तिप्पट झाले, परंतु फेब्रुवारीमध्ये त्याचे मूल्य निम्म्याहून कमी झाले. अशाचप्रकारे लासा सुपरजेनेरिक्सच्या स्टॉकला इतिहास आहे. अशी शेकडो प्रकरणे सेबीच्या निदर्शनास आली आहेत, ज्यावर सेबी कठोर पावले उचलत आहे.

 

सेबीचे कठोर पाऊल
सेबी अशा बनावट सल्लागारांविरुद्ध शोध आणि जप्तीची कारवाई करत आहे.
याशिवाय प्रेसच्या माध्यमातून लोकांमध्ये जनजागृती केली जात आहे. डेटा लीकच्या माध्यमातून फसवणूक करणार्‍यांवरही नजर ठेवली जात आहे.

 

Web Title :- Stock Market | never invest in such penny stocks they will make you poor so be careful

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा