Stock Market Updates : सेंसेक्स 435 अंकाने घसरून झाला बंद, निफ्टी 15000 च्या खाली बंद

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –   स्थानिक शेयर मार्केटमध्ये लागोपाठ चौथ्या दिवशी नफावसूली दिसून आली. व्यवहाराच्या अखेरीस शुक्रवारी बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (बीएसई) चा सेंसेक्स 434.93 अंक म्हणजे 0.85 टक्केच्या घसरणीसह 50,889.76 च्या स्तरावर बंद झाला आहे. तर, नॅशनल स्टॉक एक्सचेंज (एनएसई) चा निफ्टी 137.20 अंक म्हणजे 0.91 टक्केच्या घसरणीसह 14,981.75 च्या स्तरावर बंद झाला.

बँक निफ्टीमध्ये शुक्रवारी 1.9 पेक्षा जास्त घसरण दिसून आली. व्यवहारात ऑटो, कॅपिटल गूड्स, एनबीएफसीमध्ये सर्वात जास्त कमजोर होती.

Geojit Financial Services चे व्ही. के. विजयकुमार यांनी म्हटले की, या आठवड्यादरम्यान आम्हाला ग्लोबल बाजारांमध्ये कंसोलीडेशन आणि दुसर्‍या शब्दात सांगायचे तर हलकी घसरण दिसून आली. यामुळे हाय व्हॅल्यूएशन आणि बाजारासाठी एखाद्या जवळच्या नव्या पॉझिटिव्ह ट्रिगरचा अभाव दिसून येत आहे. आता जोपर्यंत बाजाराला ट्रिगर पॉईंट दिसत नाही तोपर्यंत आणखी काही काळापर्यंत बाजारात ही स्थिती कायम राहू शकते.

Sharekhan च्या Gaurav Ratnaparkhi यांचे म्हणणे आहे की डेली मुव्हमेंट्स इंडिकेटरचा कल मंदीकडे दिसत आहे. निफ्टी कंसोलिडेशन फेजमध्ये दिसत आहे. निफ्टीची कंसोलिडेशन रेंज 15,000-15,430 च्या दरम्यान आहे. मात्र, जर क्लोजिंग बेसिसवर निफ्टीने 15000 चा स्तर तोडला तर पुन्हा यामध्ये आणखी मोठे करेक्शन दिसू शकते.