Stock Market | शेअर बाजार कोसळला; सेन्सेक्समध्ये 1600 अंकांची घसरण, गुंतवणुकदारांना 5 लाख कोटी रुपयांचा फटका

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – शेअर मार्केट (Stock Market) सुरु होताच पहिल्याच सत्रात मार्केटमध्ये मोठी पडझड पाहायला मिळाली. अमेरिकेतील वाढत्या चलनवाढीमुळे फेडरल रिझर्व्ह कडून (Federal Reserve) व्याजदरात (Interest Rate) मोठी वाढ केली जाण्याच्या चिंतेने जगभरातील भांडवली बाजारात (Stock Market) मोठी घसरण झाली आहे. याचा परिणाम देशांतर्गत भांडवली बाजारावर झाला. परिणामी सेन्सेक्स तब्बल 1600 अंकांनी (Sensex Tumbled) कोसळला. तर निफ्टीचा (Nifty) निर्देशांक 15 हजार 800 च्या खाली आला. परिणामी गुंतवणुकदारांना 5 लाख कोटी रुपयांचा फटका (Investors Lose) बसला आहे.

 

सध्या सेन्सेक्समध्ये 1600 अंकांची घसरण असून तो 52 हजार 700 पातळीवर स्थिरावला आहे. निफ्टी हा राष्ट्रीय शेअर बाजाराचा (National Stock Market) निर्देशांकही सुमारे 400 अंकांनी घसरुन 15 हजार 800 च्या पातळीवर सोमवारी सकाळी आला. निफ्टीवरील बँक आणि वित्तीय निर्देशांक 2.5 टक्क्यांहून अधिक घसरले आहेत. आयटी (IT) निर्देशांकमध्ये सुमारे तीन टक्क्यांनी, वाहन (Vehicle) निर्देशांकमध्ये 2 टक्के आणि रियल्टी (Realty) निर्देशांक 2.5 टक्यांहून अधिक घसरण झाली आहे.

 

आजच्या सर्वाधिक नुकसान झालेल्यांमध्ये बजाज ट्विन्स (Bajaj Twins), स्टेट बँक ऑफ इंडिया (State Bank of India),
इंडस इंडिया बँक (Indus India Bank), कोटक बँक (Kotak Bank), एचडीएफसी (HDFC) आणि INFY या कंपन्यांचा समावेश आहे.
या सर्वच प्रमुख कंपन्यांच्या शेअरमध्ये तीन टक्क्यांपेक्षा अधिक घसरण झाली आहे.

LIC च्या शेअर्समध्ये मोठी घसरण
विमा कंपनी एलआयसीच्या शेअर्समध्ये मोठी घसरण झाली आहे.
आज सलग 10 व्या दिवशी शेअर खाली आला असून तो 682 रुपयापर्यंत खाली आला आहे.
सूचीबद्ध झाल्यापासून स्टॉकमध्ये घसरण होत आहे. आणि दररोज विक्रमी निचांकी नोंदवली जात आहे.

 

घसरणीचे कारण काय ?
देशात गुंतवणूकदारांनी माहिती तंत्रज्ञान, वित्त, बँकिंग आणि ऊर्जा क्षेत्रातील समभागांमध्ये विक्रीचा सपाटा लावल्याने भांडवली बाजारातील प्रमुख निर्देशांक दीड टक्क्यांहून अधिक कोसळले.
डॉलरच्या तुलनेत रुपयाचे घसरते मूल्य, खनिज तेलाचे वाढते दर आणि परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांकडून अथकपणे सुरु असलेल्या निधीच्या निर्गमनामुळे निर्देशांकातील घसरण अधिक वाढली.

 

Web Title :- Stock Market | sensex tumbles 1600 points investors lose 5 lakhs crores

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा