Stock Market | शानदार रिटर्न कमवायचा आहे का ? मग आगामी वर्षभरात तुम्हाला मालामाल करतील ‘हे’ 5 शेयर; जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Stock Market | 18 नोव्हेंबर 2021 ते 18 नोव्हेंबर 2022 दरम्यान शेअर बाजाराने (Stock Market) 19 टक्के रिटर्न दिला आहे. या काळात बाजारात प्रचंड अस्थिरता होती. ऑक्टोबरमध्ये बाजाराने सर्वकालिक उच्चांक गाठला. त्यानंतर त्यात 7.5 टक्क्यांनी घट झाली. या दरम्यान विशेष बाब म्हणजे जवळपास प्रत्येक सेक्टरची कामगिरी सकारात्मक होती. (Share Market Marathi News)

 

मेटल सेक्टरने 56 टक्के आणि पॉवर सेक्टरने 59 टक्के रिटर्न दिला. होळीच्या निमित्ताने अशा 5 स्टॉक्सबद्दल आपण जाणून घेणार आहोत जे तुम्हाला पुढील होळीपर्यंत 15 टक्क्यांपर्यंत रिटर्न देऊ शकतात.

 

1. HDFC Bank
व्याजदर वाढण्याची चिन्हे आहेत. याचा फायदा बँकांना मिळणार आहे. कोरोना महामारीनंतर व्यावसायिक हालचालींमध्ये पुन्हा वाढ होत आहे. त्यामुळे कर्जाची मागणी वाढेल. दुसरीकडे, आरबीआयने एचडीएफसी बँकेच्या नवीन डिजिटल इनिशिएटीव्हवरील स्थगिती उठवली आहे.

याचा फायदा एचडीएफसी बँकेलाही होणार आहे. एचडीएफसी बँकेचा रिटर्न ऑन इक्विटी (ROE) चांगला आहे. त्याचे मूल्यांकनही वाजवी आहे. एचडीएफसी बँकेचा शेअर पुढील एका वर्षात चांगला रिटर्न देऊ शकतो. (Stock Market)

 

2. Tata Elxsi
टाटा अ‍ॅलेक्सीचा स्टॉक मल्टिबॅगर ठरला आहे. गेल्या वर्षी त्याची कामगिरी उत्कृष्ट होती. ही कंपनी आपल्या क्लाएंटला एंड – टू – एंड सोल्यूशन्स प्रदान करते. तिची नफा वाढ आणि महसूल आकर्षक आहे. नफ्याचे मार्जिनही चांगले आहे. इक्विटीवर रिटर्न चांगला आहे.

त्यांच्याकडे भरपूर रोकड आहे, ज्यामुळे भांडवली खर्च करणे सोपे होईल. कंपनीने इलेक्ट्रिक, ऑटोमेटेड आणि कनेक्टेड व्हेइकल्स (EACV), 5 जी आणि मेडिकल इलेक्ट्रॉनिक्सवर लक्ष केंद्रित करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचा फायदा तिला मिळेल.

3. Tata Steel
टाटा स्टीलचा शेअर अनेक दिवसांपासून चर्चेत आहे. स्टीलच्या किमतीत झालेली वाढ हे त्याचे कारण आहे. स्टीलच्या किमतीत वाढ झाल्यामुळे कंपनीला अधिक नफा मिळवता आला आहे. यामुळे तिचे कर्ज कमी होण्यास खूप मदत झाली आहे.

रशिया – युक्रेन संकटाचा फायदा टाटा स्टीललाही होताना दिसत आहे. ते युरोपियन ग्राहकांना रशियामध्ये बनवलेल्या स्टीलचा पर्याय देत आहे. युरोपियन बाजारपेठेत कंपनीची चांगली उपस्थिती आहे.

 

4. Valiant Organics
विशेष रसायने बनवणार्‍या या कंपनीने चांगली कामगिरी केली आहे.
चांगल्या फंडामेंटल्स असूनही, तिच्या स्टॉकमध्ये घट झाली आहे.
कंपनी व्यवसायाच्या विस्तारासाठी खूप पैसा खर्च करत आहे. बहुतांश महसूल भांडवली खर्च म्हणून वापरला जात आहे.

या भांडवली खर्चाचा फायदा कंपनीला नवीन प्लांटमध्ये उत्पादन सुरू झाल्यावर मिळेल.
कंपनी अशी उत्पादने बनवण्यासाठी जास्त खर्च करत आहे, ज्यासाठी चीन मोठा पुरवठादार आहे.

 

5. KSB
केएसबी ही बहुराष्ट्रीय कंपनी (MNC) आहे. तिचे मूल्यांकन आकर्षक आहे.
ती विविध प्रकारच्या उद्योगांसाठी पंप आणि व्हॉल्व्ह तयार करते. त्यांचा पंप आण्विक क्षेत्रातही वापरला जातो.

व्यवसायाचा विस्तार करण्यासाठी कंपनी खूप पैसा खर्च करत आहे. त्यांची ऑर्डर बुक खूप ठोस आहे.
रोख प्रवाह खूप चांगला आहे. दीर्घकाळात चांगली कामगिरी करण्याची अपेक्षा आहे.

 

डिस्क्लेमर : (येथे दिलेला मजकूर केवळ माहितीच्या हेतूने दिलेला आहे. येथे सांगणे आवश्यक आहे की, मार्केटमधील गुंतवणूक बाजार जोखमीच्या अधीन आहे. गुंतवणुकदार म्हणून पैसे लावण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्या. www.policenama.com कडून कुणालाही पैसे लावण्याचा कधीही सल्ला दिला जात नाही.)

 

Web Title :- Stock Market | these five shares may make you rich by next holi Stock Market Marathi News

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा