Stock Market Today : विक्रमी स्तरावर बंद झाला बाजार, सेंसेक्स 51340 च्या पुढे, निफ्टीमध्ये सुद्धा शानदार वाढ

नवी दिल्ली : सोमवारी बाजारात शानदार वाढ दिसून आली. सेंसेक्स आणि निफ्टी दोन्हीही इंडेक्सने नवीन रेकॉर्ड बनवला आहे. सेसेंक्स 618 अंक म्हणजे 1.22 टक्के वाढीसह 51,348.77 च्या स्तरावर बंद झाला आहे. तर, निफ्टी 192 अंक म्हणजे 1.28 टक्केच्या मजबूतीसह 15115.80 च्या सतरावर बंद झाला आहे. याशिवाय बँक निफ्टी लागोपाठ 8 व्या दिवशी तेजीसह क्लोज झाला आहे. निफ्टी बँक 35,980 च्या पुढे पोहचण्यात यशस्वी झाला आहे.

आज ऑटो, मेटल, आयटी शेयरमध्ये चांगली खरेदी पहायला मिळाली. महिंद्रा अँड महिंद्रा आणि बजाज फिनसर्व्ह आजचे टॉप गेनर्स ठरले. तर एचयूएल आणि कोटक बँक आजचे टॉप लूझर्स आहेत.

घसरण झालेले स्टॉक्स
दिग्गज शेयर्सबाबत बोलायचे तर आज सेंसेक्सच्या 30 पैकी 24 शेयर्स तेजीसह बंद झाले. याशिवाय 6 स्टॉक्समध्ये विक्री दिसून आली. आज HUL 1.43 टक्केच्या घसरणीसह टॉप लूझर्सच्या लिस्टमध्ये होता. याशिवाय kotak bank, Bajaj Finance, ITC, Bajaj Auto आणि Sun pharma विक्रीसह बंद झाले आहेत.

तेजीवाले शेयर्स
याशिवाय तेजीवाल्या शेयर्सबाबत बोलायचे तर M&M 7.23 टक्केच्या वाढीसह टॉप गेनर्सच्या लिस्टमध्ये होता. तसेच बजाज फायनान्स, भारती एयरटेल, इन्फोसिस, ICICI Bank, SBI, LT, ONGC, NTPC, HDFC, HDFC Bank, TCS,टेक महिंद्रा, अ‍ॅक्सिस बँक, नेस्ले इंडिया, रिलायन्स सर्व हिरव्या निशाणावर बंद झाले.

सेक्टोरियल इंडेक्समध्ये होती तेजी
सेक्टोरियल इंडेक्सबाबत बोलायचे तर आजBSE FMCG मध्ये विक्री दिसून आली. याशिवाय सर्व सेक्टर्समध्ये चांगली खरेदी झाली. सोमवारी दिवसभर व्यवहारानंतर बीएसई ऑटो, कॅपिटल गुड्स, बँक निफ्टी, कंझ्यूमर ड्यूरेबल्स, पीएसयू, ऑयल अँड गॅस, पीएसयू, मेटल, हेल्थकेयर सर्वामध्ये चांगली खरेदी झाली.

स्मॉलकॅप-मिडकॅप स्टॉक्स
BSE Smallcap Index 292.65 अंकांच्या वढीसह 19388.71 च्या लेव्हलवर झाला.
BSE Midcap Index 292.13 अंकाच्या तेजीसह 19705.30 च्या लेव्हलवर बंद झाला.
CNX Midcap Index 339.10 अंकांच्या वाढीसह 22765.00 च्या लेव्हलवर बंद झाला.