सांगलीत भेसळयुक्त ‘पनीर’ व ‘खव्या’चा साठा पकडला, 3 वाहनासह 30 लाखांचा मुद्देमाल जप्त

सांगली : पोलीसनामा ऑनलाइन – कर्नाटकातून सांगली मार्गे पुण्याकडे जाणारा भेसळयुक्त खवा व पनीरचा साठा अन्न औषध प्रशासनाने सांगलीतील विश्रामबाग चौक येथे पकडला. मंगळवारी पहाटे ही कारवाई करण्यात आली. पुण्याकडे हा साठा पाठविण्यात येत असल्याची माहिती मिळाली होती त्यानुसार ही कारवाई करण्यात आली. तीन वाहनांसह 30 लाखांचा मुद्देमाल यावेळी जप्त करण्यात आला आहे. जप्त केलेला साठा एका डेअरीच्या कोल्डस्टोरेजमध्ये ठेवण्यात आला आहे.

वर्ष अखेर साजरा करण्यासाठी पुण्यातून खवा आणि पनीर ची मोठ्या प्रमाणात मागणी होती. त्यानुसार कर्नाटकातून भेसळयुक्त खवा व पनीर सांगलीतून पुण्याकडे जाणार असल्याची माहिती अन्न व औषध प्रशासनाला माहिती मिळाली होती. त्यानुसार पथकाने विश्रामबाग चौक येथे सापळा लावला होता. रात्री एकच्या सुमारास तीन वाहने दुग्धजन्य साहित्य घेऊन जात होते. संशयावरून त्यांनी त्या गाडय़ा अडवून तपासणी केली. त्यामध्ये १५ हजार ११७ किलोचा तीस लाख रुपयांचा पनीर साठा व 99 किलो सत्तावीस हजार रुपयांचा खवा साठा आढळून आला. त्या उत्पादनाचे कोणतेही परवाने व ब्रॅण्ड नसल्याचे चौकशीत स्पष्ट झाले.

शिवाय हे पदार्थ तयार करण्यासाठी कृत्रिम पद्धतीने दूध पावडर तेल व अन्य केमिकल वापरल्याचा संशय आहे. त्यामुळे पथकाने हा साठा वाहनासह ताब्यात घेतला. दापोलीस ठाण्यात नेऊन ही कारवाई करण्यात आली. त्यानंतर हा साठा पुढील तपासणी होईपर्यंत एका खासगी डेअरीत ठेवण्यास पाठविण्यात आला.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/

You might also like