मित्राला वाढदिवसाला गिफ्ट देण्यासाठी बाईक चोरली

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – एका अजब मैत्रीचा (friend) अनुभव मुंबईतील (mumbai police) नवघर परिसरात पहायला मिळाला.पोलिसांनी या दोन मित्रांना बेड्या ठोकल्या असून त्यांनी केलेले कृत्यामुळे पोलीस देखील चक्रावून गेले आहेत. मित्राला वाढदिवसाचे गिफ्ट (gift) देण्यासाठी एका मित्राने चक्क बाईक (bike stolen) चोरली. पोलिसांनी आदर्श कनोजिया (वय-20) आणि पवन भगवानदास अहिरवार (वय-20) या दोघांना अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हे दोघे जीवलग मित्र आहेत. 16 ऑक्टोबरला पवनचा वाढदिवस होता. पवनला गिफ्ट देण्यासाठी आदर्शने 15 ऑक्टोबरच्या रात्री मुलुंड पर्व परिसरातून एक बाईक चोरली. याप्रकरणी नवघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या गुन्ह्याचा तपास करत असताना ही बाईक आदर्शने चोरल्याचे समोर आले. त्यानंतर पोलिसांनी या दोन जीवलग मित्रांना बेड्या ठोकल्या.

या दोघांकडे कसून चौकशी केली असता पवनचा वाढदिवस असल्याने त्याला गिफ्ट देण्यासाठी बाईक चोरल्याची कबुली दिली. पोलिसांनी दोघांना अटक करुन बाईक ताब्यात घेतली. मित्राला गिफ्ट देण्याच्या नादात दोघेही पोलिसांच्या जाळ्यात अडकले. मित्राला खुष करण्यासाठी केलेल्या चोरीची सध्या परिसरात जोरदार चर्चा आहे. पुढील तपास नवघर पोलीस करत आहेत.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like