चोरट्यांचा कहर ! आईच्या अंत्यसंस्कारासाठी आलेल्या पोलीस अधिकाऱ्याची कार गेली चोरीस

यवतमाळ : पोलिसनामा ऑनलाईन – गणेश अणे हे अकोला पोलीस अधीक्षक कार्यालयात वरिष्ठ पोलीस निरीक्षक म्हणून कार्यरत आहेत, ते आईच्या अंत्यसंस्कारासाठी गेले असता तेथून त्यांची कार अज्ञात चोरट्याने लंपास केली. या प्रकरणी अकोला येथील वरिष्ठ पोलीस निरीक्षक गणेश काशीनाथ अणे यांनी पोलिसात तक्रार दाखल केली आहे.

आई केसरबाई काशीनाथ अणे यांचे ८ ऑगस्ट रोजी यवतमाळ येथे निधन झाले. यवतमाळ येथील एसटी कॉलनी समनानी ले-आऊट परिसरात राहणारे अणे यांचे जावई रतनसिंग बद्दू पवार यांच्या घरी केसरबाई यांच्या अंत्यसंस्काराची तयारी सुरू होती. त्यासाठी गणेश अणे हे अकोला येथून पुतण्या ललीत सीताराम राठोड याची कार (एम.एच.२९/ए.डी.२५३४) घेवून सायंकाळी रतनसिंग पवार यांच्या घरी पोहोचले. संपूर्ण कामकाज आटोपल्यानंतर त्यांनी ही कार जावयाच्या घराशेजारीच लावली होती. मात्र अज्ञात चोरट्याने ही गाडी चोरून नेल्याची तक्रार अणे यांनी दाखल केली आहे.

गाडीसोबतच चोरट्यांच्या हाताला गाडीतील सामान लागले आहे ज्यात १ लॅपटॉप आणि २ मोबाईलचा समावेश होता असे तक्रारीत अणे यांनी नमूद केले आहे.

आरोग्यविषयक वृत्त

You might also like