ससून रुग्णालयातून पाच लाखांचे नेटवर्कींचे साहित्य चोरीला

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन

ससून रुग्णालयात नव्याने बांधण्यात आलेल्या अकराव्या मजल्यावर नेटवर्कींचे काम सुरु आहे. अज्ञात चोरट्याने अकराव्या मजल्यावरील खोलीत ठेवलेले नेटवर्कींचे ४ लाख ८२ हजार २०७ रुपयांचे साहीत्य चोरुन नेले. हा प्रकार ३ जुले ते २३ जुलै दरम्यान ससून रुग्णालयातील नवीन इमारतीच्या अकराव्यामजल्यावरील खोलीत उघडकीस आला. याप्रकरणी बंडगार्डन पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
[amazon_link asins=’B00RBGYGMO’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’2b456649-918b-11e8-a9bf-b57411783db6′]

मनोजकुमार गडकर (वय-४८ रा. मालाड पूर्व, मुंबई) यांनी बंडगार्डन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी गडकर हे सरकारी ठेकेदार असून नेटवर्कींगचे साहित्य पुरवण्याचे काम करतात. ससून रुग्णालयात नव्याने बांधण्यात आलेल्या इमारतीमध्ये नेटवर्कींगचे काम सुरु आहे. या कामासाठी लागणारे साहित्य अकराव्या मजल्यावरील एका खोलीत ठेवण्यात आले होते. ३ जुलै ते २३ जुलै दरम्यान अज्ञात चोरट्याने खोलीत प्रवेश करुन नेटवर्कींगचे साहित्य चोरुन नेले. सहायक पोलीस निरीक्षक एस.ए. जमदाडे तपास करीत आहेत.