पुणे/पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी वाईन शॉपमधून वेगवेगळ्या कंपनीच्या दारूच्या बाटल्या चोरल्याची घटना उघडकीस आली आहे. चोरट्यांनी दुकानातील वेगवेगळ्या कंपनीच्या 31 दारुच्या बाटल्या चोरट्यांनी लंपास केल्या आहे. बुधवार (दि.1) रात्री पावणे अकरा ते गुरुवारी (दि.2 जानेवारी) सकाळी दहाच्या दरम्यान हा प्रकार घडला आहे.
याप्रकरणी सिद्धेश हरीश ललवाणी (वय-30 रा. पिंपळे सौदागर) यांनी याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अद्यात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. वाकड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ललवाणी यांचे काळेवाडी येथील विशालनगर येथे वाईल शॉप आहे. बुधवारी रात्री त्यांनी वाईन शॉप बंद केले होते.
दरम्यान, रात्री अज्ञात चोरट्याने दुकानाचे शटर उचकटून दुकानात प्रवेश केला. दुकानातील वेगवेळ्या कंपनीच्या 71 हजार 210 रुपयांच्या 31 दारुच्या बटल्या चोरुन नेल्या. तसेच चोरट्यांनी दुकानातील रोख रक्कम, एक डिव्हीआर व हार्ड डिस्क चोरून नेले. पुढील तपास वाकड पोलीस करीत आहेत.
फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/
- नियमित खा ‘डोसा आणि सांबर’; हे आहेत 7 आरोग्यदायी फायदे !
- गुलाब पाकळ्यांच्या चहाची वाढती क्रेझ, ‘हे’ 5 फायदे जाणून घ्या !
- पाठीच्या दुखण्याने त्रस्त आहात ? ‘हे’ 5 उपाय ठरतील फायदेशीर !
- ‘कम्प्युटर व्हिजन सिंड्रोम’ का होतो? जाणून घ्या ९ लक्षणे आणि ६ उपाय
- कोणत्या भाज्या अधिक आरोग्यदायी, ‘हे’ आहेत ६ फायदे
- सतत ‘सेल्फी’ घेता ? ‘हा’ गंभीर आजार तर नाही ना ? या 4 गोष्टी लक्षात ठेवा
- कापूरचे ‘हे’ 7 आरोग्यदायी फायदे वाचून व्हाल थक्क ! जाणून घ्या