2 मुलांच्या पोटात दुखत असल्यानं डॉक्टरनं चक्क लिहून दिली प्रेग्नेंसी टेस्ट, पुढं झालं ‘असं’ की बस्स

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – ऑपरेशनच्या वेळी अनेकदा रुग्णाच्या पोटात कोणतीही वस्तू डॉक्टर विसरल्याचे आपण अनेकवेळा पाहिले असेल, मात्र कधी रुग्णाच्या पोटात दुखत असताना त्याला गर्भवती महिलांसाठी गेली जाणारी टेस्ट करण्यास सांगितल्याचे ऐकले आहे का. मात्र झारखंडमधील एका सरकारी दवाखान्यात विचित्र घटना समोर आली आहे. येथील दोन रुग्णांच्या पोटात दुखत असल्याने ते दवाखान्यात उपचारासाठी आले. मात्र डॉक्टरांनी त्यांना ANC टेस्ट करण्यास सांगितले.

झारखंडमधील 22 वर्षाचा गोपाल गंझू आणि शेजारील गावातील सुधु गंझू हे दोघे पोट दुखत असल्याने दवाखाण्यात उपचारासाठी गेले. मात्र या रुग्णालयात तैनात असणाऱ्या डॉक्टर मुकेश यांनी दोघांना चिट्ठीवर काही टेस्ट करण्यास लिहून दिल्या. दोघेजण ज्यावेळी ह्या चाचण्या करण्यासाठी दवाखान्यत गेले त्यावेळी तेथील डॉक्टरांनी त्यांचा इतर इलाज केला मात्र ANC टेस्ट करण्यास नकार दिला.

त्यानंतर ते दोघेजण घरी गेले. त्यानंतर संपूर्ण गावात हि घटना पसरल्यानंतर डॉक्टर मुकेश यांनी आपल्यावरील सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. मला बदनाम करण्यासाठी हे षडयंत्र रचल्याचे त्यांनी म्हटले आहे.

दरम्यान, दवाखान्याचे सीएस डॉ अरुण कुमार यांनी यांच्याशी संवाद साधला असता त्यांनी सांगितले कि, त्यांना या प्रकरणाची काहीही माहिती नसून जर खरेच असे घडले असेल तर या प्रकरणाची चौकशी केली जाईल.

Visit : Policenama.com