धक्कादायक ! आकाशातून कोसळला १५ किलोचा ‘दगड’, नागरिकांनी सुरु केली त्याची ‘पूजा’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – बिहारच्या मधुबनी जिल्ह्यात एका विचित्र घटनेमुळे नागरिकांमध्ये दहशत पसरली आहे. येथील एका शेतात १५ किलोचा दगड आढळून आल्याने येथील नागरिक दहशतीखाली आहेत. येथील नागरीकांनी हा दगड आकाशातून कोसळल्याचा दावा केला आहे. या घटनेमुळे परिसरातील नागरिक थक्क झाले आहेत.

आसमान से गिरा 15 किलो का पत्थर, चमत्कार देखकर हो जाएंगे हैरान

या दगडाविषयी नागरिकांमध्ये अनेक गैरसमज पसरले आहेत. कुणी याला देवाची कृपा म्हणत आहे तर कुणी याला एलियनचा दगड म्हणत आहे. हा दगड अवकाशातून कोसळला असून यामुळे शेतात मोठा खड्डा तयार झाला आहे. पोलीस स्टेशनचे प्रमुख अरविंद कुमार यांनी सांगितले कि, हा दगड अवकाशातुन कोसळला असल्याचे स्थानिक नागरिक सांगत आहेत.

आसमान से गिरा 15 किलो का पत्थर, चमत्कार देखकर हो जाएंगे हैरान

या दगडात चुंबकीय शक्ती असून यावर लोहचुंबक देखील चिकटत आहे. यामुळे दगड तपासणीला पाठवण्यात आला आहे. स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, मोठ्या आवाजासह हा दगड या भाताच्या शेतात येऊन कोसळला. यावेळी ज्या ठिकाणी हा दगड कोसळला तेथे काही काळासाठी सफेद धूर पाहायला मिळाला होता आणि त्याचबरोबर तेथील जमीन देखील गरम झाली होती.

आसमान से गिरा 15 किलो का पत्थर, चमत्कार देखकर हो जाएंगे हैरान

हि घटना सगळीकडे पसरल्यानंतर हा दगड पाहण्यासाठी आजूबाजूच्या गावातील नागरिकांनी गर्दी केली होती. काही नागरिकांनी तर त्या दगडाला देवाचा दर्जा देत त्याची पूजा देखील केली. काही नागरिकांनी या दगडाला पिंपळाच्या झाडाखाली ठेऊन याची पूजा करण्यास सुरुवात केली.

आसमान से गिरा 15 किलो का पत्थर, चमत्कार देखकर हो जाएंगे हैरान

दरम्यान, या दगडाविषयी बोलताना वैज्ञानिकांनी म्हटले आहे कि, हा दगड उल्कापिंड असू शकतो. आकाशात विजेच्या धक्क्यामुळे दगड मॅग्नेटिक शक्तीत बदलला जातो. त्यामुळे या दगडाविषयी घाबरण्याचे कारण नसल्याचे देखील त्यांनी स्पष्ट केले.

आसमान से गिरा 15 किलो का पत्थर, चमत्कार देखकर हो जाएंगे हैरान

आरोग्यविषयक वृत्त –