Stone Fruits | कोलेस्ट्रॉल आणि ब्लड शुगर कमी करतात स्टोन फ्रूट, जाणून घ्या हे काय आहे

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Stone Fruits | स्टोन फ्रुटचे फायदे फार कमी लोकांना माहिती आहेत. गाठीसारख्या फळांना स्टोन फ्रुट म्हणतात. स्टोन फ्रुट ब्लड कोलेस्ट्रॉल आणि ब्लड शुगर दोन्ही नियंत्रित करतात. ब्लड प्रेशर आणि ब्लड शुगर या आजच्या जगातील दोन मोठ्या समस्या आहेत. ब्लड प्रेशर आणि ब्लड शुगरमुळे दरवर्षी लाखो लोकांचा मृत्यू होतो. डब्ल्यूएचओच्या मते, जगभरात सुमारे १.२८ अब्ज लोकांना हाय ब्लड प्रेशर आहे, परंतु दुर्दैवाने त्यापैकी ४६ टक्के लोकांना हे देखील माहित नाही की त्यांना ब्लड प्रेशरचा आजार आहे. (Stone Fruits) जेव्हा ते इतर काही समस्यांवर उपचार घेण्यासाठी जातात तेव्हा त्यांना समजते की त्यांचे बीपी वाढले आहे. अशावेळी या दोन्ही आजारांवर नियंत्रण ठेवण्यासाठी स्टोन फ्रुट खूप फायदेशीर आहे (Tips to prevent blood sugar and cholesterol).

 

स्टोन फ्रुट म्हणजे काय
गाठीसारख्या फळांना स्टोन फ्रुट म्हणतात. स्टोन फ्रुटमध्ये बदाम, प्लम, जर्दाळू, पीच, चेरी, मनुका, पेरू, आंबा, लिची, रास्पबेरी, स्ट्रॉबेरी, ब्लॅकबेरी, तुती, ऑलिव्ह, नारळ, खजूर इत्यादी फळांचा समावेश होतो, त्यांना अँटी-इम्फ्लेमेटरी फळे असेही म्हणतात. या फळांच्या बहुतांश झाडांसाठी तापमान २० ते २५ अंश लागते. ही फळे जास्त तापमान असलेल्या ठिकाणी येत नाहीत. मात्र, आंबा, लिची ही उन्हाळी फळे आहेत.

स्टोन फ्रुट कसे आहे लाभदायक
हार्वर्ड मेडिकल स्कूलची वेबसाइट हेल्थ हार्वर्डनुसार, स्टोन फ्रूटमध्ये भरपूर फायबर असते. याशिवाय यामध्ये व्हिटॅमिन सी, पोटॅशियम आणि अनेक प्रकारचे फायटोकेमिकल्स मुबलक प्रमाणात असतात. ब्लड शुगर आणि कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी स्टोन फ्रुट उपयुक्त असल्याचे संशोधनात आढळून आले आहे. स्टोन फ्रुटच्या सेवनाने रक्तदाब नियंत्रित राहतो.

 

काही अभ्यासात असेही म्हटले आहे की स्टोन फ्रुट व्यायामानंतरच्या वेदना आणि थकवा दूर करते.
यासोबतच चेरीसारख्या फळांमुळे सांधेदुखीचा त्रास कमी होतो.
चेरीमध्ये असलेले फिनोलिक कंपाऊंड अँटी-इंफ्लेमेटरी आहे, ज्यामुळे संधिवात रुग्णांमध्ये गुडघ्याखाली आलेली सूज कमी होते.

 

फक्त आणि फक्त आरोग्याच्या (हेल्थ) बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा

 

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही.
त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं. अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

 

Web Title :- Stone Fruits | Stone fruit lowers cholesterol and blood sugar, know what it is

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Homemade Rice Scrub | हिवाळ्यात वापरा घरी तयार केलेले हे ४ राईस स्क्रब, स्किनवर येईल ‘ग्लो’

Health Tips | रिकाम्यापोटी चुकूनही खाऊ नका या 5 वस्तू, आरोग्याला होऊ शकते हे मोठे नुकसान

Winter Health Tips | हिवाळ्यात स्वेटर घालून झोपण्याची सवय असेल तर व्हा सावध, होईल इतके नुकसान