जन आशिर्वाद रॅलीत मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या गाडीवर दगडफेक

भोपाळ : वृत्तसंस्था

मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी सुरु केलेल्या जन आशिर्वाद रॅलीला चुरहट येथे गालबोल झाले असून त्यांच्या गाडीवर दगडफेक होण्याचा प्रकार घडला आहे.

[amazon_link asins=’B06W9G3H64,B00YELNC3S’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’ec3ee257-af3d-11e8-b83d-972640279a4b’]

मध्य प्रदेशातील चुरहट येथे रविवारी शिवराज सिंह चौहान यांच्या जन आशीर्वाद यात्रेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळेस त्यांच्या रथावर अज्ञातांनी दगडफेक केली. सुदैवाने या घटनेत कोणालाही दुखापत झालेली नाही. मात्र, मुख्यमंत्र्यांच्या रथाच्या काचा फुटल्याने त्याचे नुकसान झाले आहे. दरम्यान, दगडफेक कोणी केली, याबाबतची माहिती अद्याप स्पष्ट होऊ शकलेली नाही. पण दगडफेकीस भाजपाने काँग्रेसला जबाबदार ठरवले आहे.

जाहिरात

भाजपाचे नेते राकेश सिंह यांनी काँग्रेसने दगडफेक केल्याचा आरोप आहे. यासंदर्भात ट्विट करत त्यांनी म्हटले आहे की, चुरहट विधानसभा क्षेत्रात शिवराज सिंह चौहान यांच्या जन आशीर्वाद यात्रेच्या रथावर केलेली दगडफेक हे भ्याडपणाचे लक्षणे आहे. सभ्य समाजात अशा गोष्टी सहन केल्या जाणार नाहीत. या भ्याड हल्ल्यास खुद्द जनता काँग्रेसला चोख प्रत्युत्तर देईल़  दुसरीकडे, मध्य प्रदेश भाजपाचे मीडिया प्रभारी लोकेंद्र पराशर यांनी म्हटले की, चुरहटमध्ये जन आशीर्वाद यात्राला जनतेचे मोठ्या प्रमाणात समर्थन मिळाले. यामुळे काही जणांनी घाबरुन अशा पद्धतीने दगडफेक केली. राज्यातील जनता आणि ईश्वर मुख्यमंत्र्यांसोबत आहेत. भ्याड हल्ला करणाºयांनो, जनता तुम्हाला योग्य उत्तर देईल.

सीधी जिल्ह्यातील मायापूर येथे शिवराज सिंह चौहान यांना विरोध दर्शवत काळे झेंडे दाखवण्यात आले. पण काळे झेंडे दाखवणाºयांबाबतची माहिती अद्यापपर्यंत स्पष्ट होऊ शकलेले नाही.

जाहिरात