आक्षेपार्ह मेसेज व्हायरल झाला ; काही वेळातच जमावात आरडाओरड, दगडफेक !

जळगाव : पोलीसनामा ऑनलाइन – आक्षेपार्ह मेसेस व्हायरल झाल्याची वार्ता परिसरात पसरल्यानंतर अचानक दगडफेक झाल्याने वातावरण तंग झाल्याची घटना रविवारी सायंकाळी खंडेरावनगरातील मशिदजवळ आझादनगर चौकात घडली. यामुळे परिसरात घबराट निर्माण होऊन पळापळ झाली. घटनेची माहिती कळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत गर्दीला पांगविले.

एका तरूणास व्हॉटसअपवर आलेला मेसेज त्याने व्हायरल केला. आक्षेपार्ह मेसेजमुळे तरूणांनी संतप्त भावना व्यक्त केल्या. नंतर जमाव जमल्यानंतर दोन्ही गटाकडून दगड भिरकाविले गेले. हा प्रकार आज सायंकाळी साडेपाच ते पावणेसहा वाजेच्या सुमारास खंडेरावनगरातील आझादनगर चौक परिसरात घडला.

अचानक आरडाओरड, दगडफेक या प्रकाराने परिसरात घबराट निर्माण होऊन गोंधळ निर्माण झाला. नेमके काय घडले, हे कळण्यापूर्वीच काही तरूणांनी एकमेकांवर दगड भिरकाविले. या घटनेची माहिती कळताच पोलिसांची कुमक घटनास्थळी रवाना करण्यात आली. अपर पोलीस अधीक्षक मतानी यांच्यासह, एलसीबीचे पोलीस निरीक्षक बी.जे. मतानी, रामानंदनगर पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक सचिन बेंद्रे, उपनिरीक्षक रोहिदास ठोंबरे यांच्यासह कर्मचाऱ्यांनी धाव घेतली.

ज्येष्ठ अभिनेते कादर खान यांचे निधन