दिल्ली हिंसाचार : AAP चे नगरसेवक ताहिर हुसेनच्या घराच्या छतावरून पेट्रोल बॉम्ब, दगड आणि वीट जप्त

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – नागरिकत्व दुरुस्ती कायद्यावरून दिल्लीत झालेल्या हिंसाचारावरून आरोप – प्रत्यारोपाची फेरी सुरूच आहे. त्यात आम आदमी पक्षाचे नगरसेवक ताहिर हुसेन यांच्यावर हिंसा भडकवण्याचा आरोप करण्यात आला आहे. दरम्यान, अशी काही छायाचित्रे आणि व्हिडिओ समोर आले आहेत ज्यामुळे ताहिर हुसेनच्या अडचणी वाढू शकतात. या चित्रांमध्ये हे स्पष्टपणे दिसून येते की ताहिर हुसेनच्या छतावर पेट्रोल बॉम्बचा साठा, दगड तसेच विटांच्या तुकड्यांचा साठा आहे. इतकेच नाही तर दगड सोडण्यासाठी गिलवर देखील आढळले आहेत.

ताहिर हुसेनच्या घरावरून केली गेली दगडफेक :
माहितीनुसार आपचे नगरसेवक ताहिर हुसेन यांनी आपल्या समर्थकांना आणि स्थानिकांना दगडफेक करण्यास सांगितले. व्हिडिओमध्ये ताहिर हुसेनचे समर्थक त्यांच्या घराच्या छतावरून दगडफेक करताना दिसून येत आहेत. व्हिडिओमध्ये असेही दिसून येत आहे कि, विरोधकांना रोखण्याऐवजी ताहिर इकडे – तिकडे फिरत आहेत. तसेच ताहिरच्या घराशेजारील एका घरावर हल्ला करण्यात आला असून ट्रोल बॉम्बने ते पेटवून दिले. त्यानंतर स्थानिकांनी ताहिरच्या घराच्या आत दगडफेक करणाऱ्यावर हल्ला केला. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर, ताहिरने स्पष्टीकरण देताना स्वत: ला पीडित म्हणून दाखवण्याचा प्रयत्न केला आणि स्वत: पोलिसांनी वाचवले असे सांगत एक व्हिडिओ प्रसिद्ध केला.

अंकितच्या कुटूंबाचा आरोप :
त्याचवेळी या हिंसाचारात ठार झालेल्या इंटेलिजेंस ब्युरो (आयबी) चा कर्मचारी अंकित शर्मा याच्या कुटुंबीयांनी आपच्या नगरसेवक ताहिर हुसेनवरही आपल्या मुलाच्या मृत्यूचा आरोप केला आहे. अंकित घराबाहेर पडला आणि पुन्हा परत आला नाही, असा आरोप अंकितच्या कुटुंबीयांनी केला. ते म्हणाले की, अंकित शर्माला मारहाण करण्यात आली आणि नंतर त्याचा मृतदेह सापडला.

You might also like