दोन गटांच्या भांडणातून पोलीस चौकीवर दगडफेक ?

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – पिंपरी चिंचवड आयुक्तालयातील चिखली पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या साने पोलीस चौकीवर दगडफेक केल्याचा प्रकार घडला आहे. मात्र, पोलिसांनी असा कोणताही प्रकार घडला नसल्याचे सांगितले. दरम्यान, या ठिकाणी दोन गटांमध्ये तणाव निर्माण झाल्याने पोलिसांनी या ठिकाणी अतरिक्त पोलीस तैनात करण्यात आले असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात येत आहे.

साने पोलीस चौकीच्या हद्दीत असलेल्या एका झोपडपट्टीमध्ये दोन गटात वाद झाले होते. दोन्ही गटातील लोक एकमेकांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यासाठी साने पोलीस चौकीत आले होते. दरम्यान, चौकीमध्ये गुन्हा दाखल करण्यावरुन त्यांच्यामध्ये पुन्हा वाद निर्माण झाले. पोलिसांनी दोन्ही गटांना शांत राहण्याचे आवाहन केले. मात्र, परिस्थीती हाताबाहेर जात असल्याचे पाहून पोलिसांनी अतिरीक्त पोलिसांचा फौज फाटा याठिकाणी तैनात केला.

स्थानिक नागरिकांनी चौकीवर दगफेक केल्याचे सांगितले आहे. तर पोलिसांकडून दगफेड झाली नसल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान दोन्ही गटातील लोकांवर साने चौकीत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले. साने चौकीजवळ पोलीस तैनात करण्यात आले असून सध्या या ठिकाणची परिस्थिती नियंत्रणात आहे.

वजन कमी करण्याचे ‘हे’ १५ रामबाण उपाय, घाम देखील येणार नाही

स्तनाच्या कर्करोगाची ‘ही’ ६ लक्षणं, जाणवल्यास ‘हे’ ४ उपाय तात्काळ करा, जाणून घ्या

गुलाबाच्या फुलाचे अशाप्रकारे सेवन ‘या’ आजारांसाठी उपयुक्‍त, जाणून घ्या

‘हे’ उपाय केल्यास ‘गॅस्ट्रिक ट्रबल’मध्ये त्वरित मिळेल आराम, औषध घेण्याची गरज नाही

दात मजबुत आणि पांढरे शुभ्र राहण्यासाठी ‘या’ ८ पदार्थांचं सेवन नक्‍की टाळा

पांढरे केस पुन्हा काळे करायचे आहेत मग ‘या’ १३ पैकी कोणताही एक उपाय कराच

विज्ञान आणि आयुर्वेद सांगतं ‘या’ पदार्थाने करा जेवणाची सुरूवात, ‘हे’ फायदे होतात