साताऱ्यात सरकारी वकिलाच्या घरावर दगडफेक

सातारा : पोलीसनामा आॅनलाईन

शहरातील कृष्णानगर परिसरात राहणाऱ्या एका सरकारी वकिलाच्या घरावर अज्ञातांनी दगडफेक केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. अॅड. विकास पाटील- शिरगावकर असे घरावर दगडफेक झालेल्या सरकारी वकिलाचे नाव आहे. सुदैवाने या घटनेत कोणीही जखमी झाले नसून, कुटुंबीय मात्र घाबरले आहेत. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आाहे सदर घटनेचा पंचनामा करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, अॅड. विकास पाटील हे आपल्या परिवारासोबत कृष्णानकर परिसरात रहात आहेत. शुक्रवारी कामानिमित्त ते जिल्हा कोर्टात गेले होते तर पत्नी व मुले घरी होती. दुपारी अडीच वाजण्याच्या दरम्यान चार ते पाच जणांचे एका टोळक्याने घरावर दगडफेक केली.

दगडफेकीमध्ये घराच्या काचा फुटल्या असून कुटुंबीयामध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे.. मदतीसाठी घरातल्‍या सदस्‍यांनी आरडाओरडा केल्यानंतर हल्लेखोर पसार झाले. या घटनेनंतर या परिसरात खळबळ उडाली. तत्काळ शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. दरम्यान, ॲडव्होकेट विकास पाटील- शिरगावकर हे सातारा जिल्हा न्यायालयातील तत्कालीन जिल्हा सरकारी वकील असून, अनेक केसेसमध्ये त्यांची शासनाने विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्त केली आहे