जिल्हाधिकारी कार्यालयाची तोडफोड तर चांदणी चौकात पोलिसांवर दगडफेक

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन

गेल्या काही दिवसांपासून आरक्षणाच्या मागणीसाठी रस्त्यावर उतरलेल्या मराठा क्रांती मोर्चाने आज महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. या अंदोलनाला पुण्यामध्ये हिंसक वळण लागले. अंदोलकांनी जिल्हाधिकारी कार्यालयाची तोडफोड केली तर चांदणी चौकात अंदोलकांनी पोलिसांवर दगडफेक केली. जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांना लाठिचार्ज करावा लागला. तसेच आंदाेलकांना पांगवण्यासाठी आश्रुधुरांचाही वापर करण्यात आला.  या दगडफेकीत काही पाेलीस कर्मचारी जखमी झाल्याचे प्राथमिक वृत्त आहे.
[amazon_link asins=’B0784D7NFX’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’16b867b5-9bc0-11e8-85d2-2b63d458fd02′]

अंदोलना दरम्यान अंदोलकांनी चांदणी चौकातील सर्व रस्ते रोखले. तसेच पुणे-बेंगलोर महामार्ग रोखून या मार्गावरील वाहतून बंद केली. दरम्यान अंदोलकांनी पोलिसांवर दगडफेक केल्याने परिसरात तणाव निर्माण झाला. जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी लाठिचार्ज करुन जमावाला पांगवले.

आंदोलकांनी पुणे-नगर रोडवर रास्ता रोको केला. या मार्गावर असेल्या हयात हॉटेलवर हल्ला केला. अंदोलकांनी हॉटलेची तोडफोड करुन हॉटेलमध्ये सुरु असलेला एक कार्यक्रम बंद पाडला. तर मुंबई-पुणे महामार्गावर उर्से टोल नाक्यावर अंदोलकांनी अंदोलन करुन महामार्ग रोखला.

पुण्यामध्ये आंदोलनला जे हिंसक वळण लागले आहे यामध्ये मराठा समाजाचे लोक नाहीत. मराठा आंदोलक हे शांततेच्या मार्गाने आंदोलन करत आहेत. मात्र या आंदोलनाला हिंसक वळण देण्यासाठी काहीजण  प्रयत्न करत आहेत. ज्यांनी तोडफोड करुन आंदोलनाला हिंसक वळण दिले आहे अशांवर कडक कारवाई करावी. आंदोलकांनी शांततेच्या मार्गाने आंदोलन करावे. तसेच कोणत्याही प्रकारची तोडफोड करुन नुकसान करुन नये असे आवाहन मराठा संघाचाचे सरचिटणीस राजेंद्र कोंढारे यांनी केले आहे.
Loading...
You might also like