‘मंकड’ असा उल्लेख नको ; केवळ ‘रन आऊट’ म्हणा : हर्षा भोगले

माहोली : वृत्तसंस्था – सध्या भारतात निवडणुकांसह आयपीएलची धुमाळी सुरु आहे. त्यात काल पंजाब आणि राजस्थानमधील दुसरा सामना झाला. यापूर्वीचा या दोन संघांचा समाना चर्चेत आला होता. त्या सामन्यात अश्विनेने बटरला ‘मंकड’ रन-आऊट केले होते. त्यामुळे हा सामना खूप रंगला होता. त्यानंतर हा वाद शांत झाला होता. मात्र काल झालेल्या सामन्यात यावर पुन्हा एकदा चर्चा रंगली.

मात्र यावर समालोचक हर्षा भोगेल यांनी एक विनंती केली आहे. या बाद प्रकारात मंकड यांचे नाव वापले जाते. त्यामुळे त्यांच्या कुटुंबीयांना वाईट वाटते आणि त्यामुळेच या पद्धतीला केवळ रन आऊटच म्हणावे, अशी विनंती भोगले यांनी केली आहे.

हर्षा भोगले यांनी असं ट्वीट केले आहे. विनू मंकड हे एक महान क्रिकेटपटू होते. त्यांनी जेव्हा बिल ब्राऊन यांना ‘त्या’ पद्धतीने बाद केले होते, तेव्हा सर डॉन ब्रॅडमन यांनादेखील त्यात काहीच गैर वाटले नव्हते. पण सध्या ‘मंकड’ रन आऊट म्हणणे आणि त्याला ‘अखिलाडूवृत्ती’चे लेबल चिटकवणे यामुळे मंकड यांचे कुटुंबीय दुःखी होत आहेत. त्यामुळे आपण त्यातील मंकड यांचा उल्लेख वगळून त्या पद्धतीला केवळ ‘रन आऊट’ इतकेच म्हणू शकत नाही का ?, अशी विनंती भोगले यांनी केली आहे.

दरम्यान, भारताचे माजी क्रिकेटपटू विनू मंकड यांनी पहिल्यांदा एक अजब प्रकारचा रन आऊट केला होता. मंकड यांनी चेंडू टाकण्याच्या आधी नॉन स्ट्राईकवरील फलंदाज बिल ब्राऊन क्रीजच्या बाहेर गेले होते, त्यामुळे मंकड यांनी त्यांना बाद केले होते. तेव्हापासून त्या पद्धतीच्या रन आऊटला ‘मंकड’ रन आऊट असे नाव पडले. असाच रन आऊट अश्विनने केला होता. मात्र त्यावर टीका झाल्या तसंच हे अखिलाडूव़ृत्तीचे आहे, असंही म्हणण्यात आले होते.