नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सर्वात लोकप्रिय इन्स्टंट मेसेजिंग ॲप व्हॉट्सॲप प्रत्येकाच्या आयुष्यात एक महत्त्वाचे संवाद माध्यम बनले आहे. आयुष्याचा एक महत्त्वाचा भाग बनले आहे असे म्हटले तर वावगं ठरणार नाही. अनेकांकडे स्मार्टफोन असल्याने आपण फोटो, व्हिडीओ पासून टेक्स्ट व्हॉट्सॲपवर पाठवू शकतो. मात्र व्हॉट्सॲपवर जर तुमच्याकडून चुकूनही काही चुका झाल्या. तर तुमचा डेटा लिक होण्याची भीती आहे. त्यामुळे तुम्हाला मनस्ताप तर होईलच शिवाय जेलची हवा देखील खावी लागू शकते.
असे मेसेज फॉरवर्ड करु नका
व्हॉट्सॲपवर 21 दिवसांत पैसे डबल करण्याची स्कीमचे मेसेज येत असतात. असे मेसेज चुकूनही इतरांना फॉरवर्ड करु नका. जर तुम्ही असे केले तर तुमचे बँक खाते रिकामे होऊ शकते. व्हॉट्सॲप मेसेज एन्क्रिप्टेड असतात. त्यामुळे तुम्हाला माहिती पाहिजे की, आपण काय पाठवत आहोत. जर कोणी तुमच्या विरोधात तक्रार दाखल केली तर तुम्ही अडचणीत येऊ शकता. याशिवाय व्हॉट्सॲपवर धमकावणे, अश्लिल मेसेज करणे असे काहीही करु नका, जर यासंदर्भात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला तर तुम्हाला जेलची हवा खावी लागेल.
चुकूनही फेक अकाउंट बनवू नका
व्हॉट्सॲपवर फेक अकाउंट बनवून लोकांना त्रास देणे, किंवा पैशांची मागणी करण्याचे प्रकार समोर येत आहेत. पोलिसांकडून त्यांच्यावर कडक कारवाई केली जात आहे. त्यामुळे तुम्ही चुकूनही फेक अकाउंट बनवू नका. तुम्ही अडचणीत येऊ शकता. एखाद्याने जर तक्रार केली तर तुरुंगात जावे लागेल.
व्हॉट्सॲप हॅक करण्याचा प्रयत्न करु नका
जर तुम्ही सॉफ्टवेअर इंजिनियर असाल तर चुकूनही व्हॉट्सॲपला हॅक करण्याचा प्रयत्न करु नका. कारण व्हॉट्सॲप प्लॅटफॉर्मला हॅक करण्याचा प्रयत्न करणे हा कायद्याने गंभीर गुन्हा आहे. कंपनीकडून तुम्हाला लगेच नोटीस पाठवली जाईल. याशिवाय व्हॉट्सॲपवर कोणत्याही धर्माच्या विरोधात धार्मिक तेढ निर्माण होईल असे मेसेज फॉरवर्ड करु नका. जर तुम्ही असे केले तर तुमच्यावर गुन्हा दाखल तर होईलच. शिवाय तुरुंगात जावे लागेल.