१५ मजूर खाणीत अडकले असताना मोदी फोटो काढण्यात मश्गुल – राहुल गांधी 

शिलाँग : मेघालय वृत्तसंस्था – मेघालयात कोळशाच्या खाणीत १३ डिसेंबर पासून १३ मजूर अडकून पडलेले आहेत. त्यांना वाचवण्याचे शर्तीचे पर्यंत सध्या सुरु आहेत. शांतच राहुल गांधी यांनी त्याविषयीचा मोदींच्या फोटो काढण्याशी संबंध जोडून मोदींची चांगलीच पंचायत केली आहे. त्या मजुरांना वाचवण्यासाठी सरकार हाय प्रेशर पंप का लावत नाही. असा सवाल विचारणारे ट्विट राहुल गांधी यांनी केले आहे.

मेघालयात एका दगडी कोळशाच्या खाणी मध्ये १५ कर्मचारी १३ डिसेंबर पासून मृत्यूशी झुंज देत आहेत. त्यांना वाचवण्यासाठी मोदी कसल्याही प्रकारचे प्रयत्न करत नाहीत. सरकारने साधे हाय प्रेशर पाणी उपसणारे पंप सुद्धा घटना स्थळी पाठवले नाहीत असे ट्विट राहुल गांधी यांनी केले आहे. संकटात सापडलेल्या  गोर गरीब कामगारांच्या मदतीला दाखून येण्याचे अनोखे शस्त्र राहुल गांधी यांनी उपसले असून त्यांच्या या ट्विटने मोदींना चांगलेच लक्ष केले आहे. खाणीत काम करणाऱ्या लोकांचा  १३ तारखेला संपर्क तुटला आणि त्यांना वर येणे शक्य झाले नाही तेव्हा पासून त्यांना शोधण्याचा प्रयत्न युद्ध पातळीवर सुरु आहे. त्याच प्रमाणे त्या कामगारांच्या घरच्या लोकांची अवस्था चिंतेने घायाळ झाली आहे. अशा समस्येत पंतप्रधानांनी जातीने लक्ष घातले पाहिजे तर ते फोटो काढण्यात दंग आहेत असे राहुल गांधींनी आपल्या ट्विटरच्या माध्यमातून म्हणले आहे.

खाणकामगार मृत्यूशी झुंज देत असताना देशाचे पंतप्रधान बोगीबील सेतूवर फोटो साठी पोज देत आहेत अशी खोचक टीका राहुल गांधी यांनी केली आहे. राहुल गांधी यांनी टीका करण्या अगोदर काँग्रेसचे प्रवक्ते  रणदीप सुरजेवाला यांनीही मोदींवर याच विषयाचा धागा पकडून टीका केली आहे. सरकार या विषयाकडे पाहिजे तेव्हढे चांगल्या पध्द्तीने लक्ष देत नाही असे सुरजेवाला म्हणाले असून त्यांनी त्या खाणकामगाराच्या जीवाचे रक्षण करण्यासाठी देवा कडे प्रार्थना केली आहे. सुरुजेवाला यांच्या विधानाचा धागा पकडून राहुल गांधी यांनी मोदींवर निशाणा साधला असून राहुल गांधी सध्या ट्विटर वरून मोदींना घेरण्याचा प्रयत्न करत आहेत.

You might also like