खाजगी जागेतून ड्रेनेज लाईन टाकण्याचे काम थांबवले

पिंपरी : पोलिसनामा ऑनलाईन
आळंदी नगरपरिषदेच्या विकास कामाच्या नावाखाली खासगी जागेतून ड्रेनेज लाईन टाकण्याचे काम मानवी हक्क संरक्षण आणि जागृती या संस्थेच्या पाठपुराव्यामुळे बंद करण्यात आले.

[amazon_link asins=’B0784D7NFX’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’886eba62-b67f-11e8-87cf-5574366db624′]

आळंदी येथे आळंदी नगर परिषदेच्या वतीने ड्रेनेज लाईन टाकण्याचे काम सर्वे नंबर ११५/२ काळे कॉलनीत चालू आहे. नगर परिषदीने खाजगी प्लॉट मधून घेऊन जाण्याचे नियोजन केले होते. कामाला सुरुवात झाली होती. हे काळे कॉलनीतील लोकांच्या लक्षात आल्यावर त्यांनी मानवी हक्क संरक्षण आणि जागृती या संस्थेशी संपर्क साधला.

सकल मराठा समाज राजकारणाच्या आखाड्यात

संस्थेचे पिंपरी चिंचवडचे शहराध्यक्ष अण्णा जोगदंड आणि स्थानिक  नागरिक व पदाधिकारी यांनी नगरपरिषदीचे सी. ई. ओ. समीर भूमकर यांना निवेदन दिले. त्याच बरोबर नगरअध्यक्षा वैजयंतीताई उमरगेकर यांना निवेदन देऊन कामाची सर्व माहिती दिली. त्यांना सर्व माहिती योग्य वाटली. त्यांनी काम थांबवून ती ड्रेनेज लाईन दुसऱ्या बाजूनी घेऊन जाऊ. असे आश्वासन आम्हाला दिले.
सर्व कॉलनीतील नागरिकांना विश्वासात घेवूनच काम करणार असे नगराध्यक्षा यांनी आम्हाला सांगितले. तूर्तास काम थांबविल्याचे त्यांनी सांगितले.

[amazon_link asins=’B0756Z53JN’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’901706a2-b67f-11e8-8349-db7da52486ec’]

या निर्णयामुळे नागरीकांनी आंनद व्यक्त केल्याचे जोगदंड यांनी सांगितले. यावेळी संस्था अध्यक्ष विकास कुचेकर, मुरलीधर दळवी, संगीता जोगदंड, गोविंद धायगुडे, सदाशिव जाधव, विनायक दराडे यांनी निवेदना वर सह्या केल्या आहेत.

जाहिरात