‘धनुष्यबाणा’च्या हातात ‘घड्याळ’ गेल्यानं विकासाची ‘चक्र’ उलटीच फिरणार ! भाजपच्या ‘या’ बड्या नेत्याचा ‘घणाघात’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात शिवसेना-भाजप युती संपुष्टात आल्यानंतर शिवसेनेने राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेससोबत घरोबा करत सरकार स्थापन केले. एकेकाळी मित्र पक्ष असलेल्या आणि मोठा पक्ष ठरलेल्या भाजपला विरोधी बाकावर बसण्याची वेळ आली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतलेल्या निर्णयावरून भाजपने आपली विरोधीपक्षाची भूमिका बजावण्यास सुरुवात केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मेट्रो प्रकल्पातील कारशेडला स्थगिती दिल्याने भाजपचे नेते आशिष शेलार यांनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला आहे.

धनुष्यबाणाच्या हाती घड्याळ गेल्याने विकासाची चक्र उलटीच फिरणार असा टोला शेलार यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कार शेडला स्थगिती दिल्यानंतर आशिष शेलार यांनी ट्विट करून या निर्णयाचा निषेध केला आहे. मेट्रो प्रकल्पातील कारशेडला स्थगिती देणे हा निर्णय मुंबईकरांसाठी अत्यंत घृणास्पद आहे. मुंबईकरांच्या प्रश्नावर अस राजकारण बरे नाही, असे शेलार यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

आरे कारशेडमध्ये झालेल्या वृक्षतोडीवरून शिवसेनेने भाजपच्या विरोधात भूमिका घेतली होती. तसेच आमचे सरकार आलं तर आम्ही आरेला जंगल घोषित करणार असल्याचे आदित्य ठाकरे यांनी म्हटले होतं. दरम्यान, महाविकास आघाडीचे सरकार राज्यात स्थापन झाले. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले. त्यानंतर पत्रकार परिषदेत त्यांनी मोठा निर्णय जाहीर केला आणि तो आरे संदर्भातलाच होता. आरे कारशेडबाबत पूर्ण चौकशी होणार, तोपर्यंत मेट्रोच्या कारशेडला स्थगिती देण्यात आली असल्याचे त्यांनी जाहीर केले.

Visit : Policenama.com