उत्तर प्रदेशाला वादळाचा तडाखा

उत्तर प्रदेश : वृत्तसंस्था

उत्तर प्रदेशच्या विविध जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाने चागंलीच हजेरी लावली आहे. मात्र या मुसळधार पावसात घडणाऱ्या घटनांमुळे राज्यभरातल्या विविध जिल्ह्यामध्ये जिवीत हानी झाली असुन, यामध्ये १० जणांचा वीज पडून मृत्यू झाला तर २८ जण जखमी झाले आहेत. दरम्यान मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. पावसाबरोबरच भीषण वादळ तर काही ठिकाणी वीजा देखील पडल्या आहेत.

मृत्यूमुखी पडलेल्यांमध्ये सीतापूरच्या ६ व्यक्तींचा तर गोंडा येथील ३ अाणि फैजाबादच्या एका व्यक्तीचा समावेश आहे. फैजाबाद आणि लखनऊच्या परिसरात धुळीच्या वादळाचा फटका बसू शकतो असा अंदाज हवामान विभागाने मंगळवारी इशारा दिला होता. राजधानी दिल्लीमध्ये बुधवारी हवामान बदललेलं पाहायला मिळालं, पुढील तीन दिवस येथे धुळीचं वातावरण असू शकतो असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला अाहे.

उत्तर प्रदेशमध्ये या वादळामुळे जिल्ह्यांतील वीजप्रवाह खंडीत झाला असुन झाडे व घरे पडली आहेत. दरम्यान या वादळी पावसामुळे मृतांची संख्या वाढण्याची भीती अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. गेल्या काहि दिवसांपूर्वीही उत्तर प्रदेशला भीषण वादळाचा फटका बसला होता. त्यावेळी येथे २६ व्यक्तींनी आपला प्राण गमावला होता. दरम्यान ११ जिल्ह्यांमध्ये या वादळाचा कहर पाहायला मिळाला होता.