10 कोटी क्रेडिट आणि डेबिट कार्डचा डेटा लीक, बिटकॉइनच्या बदल्यात विकत आहेत हॅकर्स

नवी दिल्ली : 10 कोटी डेबिट आणि क्रेडिट कार्ड होल्डर्सचा डेटा डार्क वेबवर लीक झाला आहे. न्यूज एजन्सी आयएएनएसनुसार, हा दावा सायबर सिक्युरिटी रिसर्चर राजशेखर राजहरिया यांनी केला आहे. लीक झालेल्या डेटामध्ये कार्ड होल्डरचे पूर्ण नाव, फोन नंबर, ईमेल अ‍ॅड्रेस आणि कार्डची पहिले आणि शेवटचे चार डिजिट यांचा समावेश आहे. असे म्हटले जाते की, हा डेटा पेमेंट प्लॅटफॉर्म Juspay शी संबंधीत आहे. जस पे एक पेमेंट गेटवे आहे, जे अमेझॉन, मेक माय ट्रिप, आणि स्विगीसह इंडियन आणि ग्लोबल मर्चंट्सची ट्रांजक्शन प्रोसेस करते.

मात्र, बेंगळुरू आधारित या स्टार्टअपचे म्हणणे आहे की, सायबर हल्ल्यादरम्यान कोणत्याही कार्डचा नंबर किंवा आर्थिक माहितीबाबत कोणतीही तडजोड झाली नाही आणि खरी संख्या 10 कोटीपेक्षा खुप कमी आहे. न्यूज एजन्सीशी चर्चेत कंपनीच्या प्रवक्त्याने म्हटले, 18 ऑगस्ट 2020 ला आमच्या सर्व्हरपर्यंत अनधिकृत अटॅकचा प्रयत्न करण्यात आला होता, जो अर्ध्यावरच थांबवण्यात आला होता. या दरम्यान कोणताही कार्ड नंबर, फायनान्शियल किंवा ट्रांजक्शन डेटा लीक झाला नव्हता. प्रवक्त्यानुसार, काही विना-गोपनीय डेटा, प्लेन टेक्स्ट ईमेल आणि फोन नंबर लीक झाले होते, परंतु त्यांची संख्या 10 कोटी पेक्षा खुप कमी आहे.

बिटकॉइनच्या बदल्यात विकला जात आहे डेटा
राजहरिया यांनी दावा केला आहे की, हा डेटा डार्क वेबवर क्रिप्टो करन्सी बिटकॉईनद्वारे विकला जात आहे. डेटाच्या किंमतीचा खुलासा झाला नसला तरी यासाठी हॅकर्स मॅसेजिंग अ‍ॅप टेलीग्रामद्वारे संपर्क करत आहेत. रिपोर्टनुसार, जर हॅकर्स कार्ड फिंगरप्रिंट बनवण्यासाठी हॅश अल्गोरिथमचा वापर करण्यात यशस्वी झाले तर मास्कस्ड कार्ड नंबरला सुद्धा डिक्रिप्ट करू शकतात. अशावेळी सर्व 10 कोटी कार्डधारकांसाठी जोखीम आहे.

यापूर्वी सुद्धा असाच प्रकार झाला होता. त्यावेळी 70 लाख भारतीयांचा डेबिट आणि क्रेडिट कार्ड होल्डर्सचा डेटा डार्क वेबवर लीक झाला होता. रिपोर्टनुसार, तो डेटा अ‍ॅक्सिस बँक, भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड, केलॉग इंडिया प्रायव्हेट लिमिटेड आणि मॅकिंसे अँड कंपनीच्या काही कर्मचार्‍यांचा होता.