सोनं पुन्हा ‘महागलं’, चांदी ‘स्थिरावली’, जाणून घ्या आजचे ‘दर’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सोन्याच्या किंमतीत आज पुन्हा एकदा तेजी पाहायला मिळाली. दिल्ली सराफ बाजारात आज सोनं 50 रुपयांनी महागलं. तर चांदीच्या किंमतीत वाढ झालेली नाही. आज सोनं 50 रुपयांनी महागून 41,470 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहचले तर चांदी 48,100 प्रति किलोग्रॅम रुपयांवर स्थिरावली. सोनं बिठुर याच तेजीने वाढून 41,300 रुपये प्रति 10 ग्रॅमवर विकले गेले. तर 8 ग्रॅम गिन्नी 100 रुपयांनी स्वस्त होऊन 30,800 रुपये झाली.

चांदी हाजिर काल 48,100 रुपयांवर स्थिरावली होती, चांदी वायदा 161 रुपयांवरुन वाढून 46,956 रुपये प्रति किलोग्रॅम झाली. सिक्का लिवाली आणि बिकवाली काल क्रमश: 970 रुपये आणि 980 रुपये प्रति इकाई राहिले.

लंडनमध्ये सोना हाजिर आज 5.66 डॉलरने महागून 1,566.51 डॉलर प्रति 28.34 ग्रॅम वर पोहचले. दोन आठवड्याचा उच्चतम स्तर 1,568.35 डॉलर प्रति 28.34 ग्रॅम पर्यंत पोहोचले होते. फेब्रुवारीमध्ये अमेरिका सोने वायदा 1.70 डॉलर वाढून 1,558.60 डॉलर प्रति 28.34 ग्रॅम झाले.

धातू आणि दर –

– सोना स्टॅडर्ड प्रति 10 ग्रॅम – 41,470 रुपये
– सोना बिटुर प्रति 10 ग्रॅम – 41,300 रुपये
– चांदी हाजिर प्रति किलोग्रॅम – 48,100 रुपये
– चांदी वायदा प्रति किलोग्रॅम – 46,956 रुपये
– सिक्का लिवाली प्रति इकाई – 970 रुपये
– सिक्का बिकवाली प्रति इकाई – 980 रुपये
– गिन्नी प्रति आठ ग्रॅम – 30,800 रुपये

बाजार तज्ज्ञांच्या नुसार चीनमध्ये कोरोना व्हायरस पसरल्याच्या बातम्यामुळे परदेशी शेअर बाजारात घसरण आली आहे, ज्यामुळे सुरक्षित गुंतवणूक म्हणून गुंतवणूकदार सोनं खरेदी करत आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात चांदी हाजिर 0.06 डॉलरच्या तेजीने 18.12 डॉलर प्रति 28.34 ग्रॅमवर पोहचले.

फेसबुक पेज लाईक करा –