‘या’ राज्यात झाडाखाली सुरू झालं 20 वर्षापुर्वीचं सलून, PPE किट घालून कटिंग करतोय न्हावी

हरियाणा : वृत्तसंस्था – हरियाणा सरकारने आता सर्व सलून आणि ब्युटी पार्लर उघडण्यास परवानगी दिली आहे. यानंतर मोठमोठे सलून तर उघडलेच, सोबतच रस्त्याच्या बाजूला किंवा झाडाखाली चालणारे सलून देखील उघडले आहेत. पंचकुला येथील दोन भावांनी देखील पुन्हा त्यांच्या २० वर्ष सलूनमध्ये काम सुरू केले आहे. दोघेही सरकारच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन काटेकोरपणे करत आहेत.

लॉकडाऊन मध्ये सूट मिळाल्यानंतर दोन्ही भावांनी केवळ सलूनच उघडले नाही, तर कोरोना संक्रमण टाळण्यासाठी पीपीई किट देखील वापरत आहेत. ते म्हणाले की, आम्ही २० वर्षांपासून येथे सलून चालवत आहोत. आम्ही आमचे संरक्षण आणि ग्राहकांच्या संरक्षणासाठी पीपीई किट देखील खरेदी केले.

नवीन मार्गदर्शक सूचनांनुसार ताप, सर्दी आणि खोकला असलेल्यांना सलून आणि ब्युटी पार्लरमध्ये प्रवेश मिळणार नाही. प्रत्येक ग्राहकाच्या वापरानंतर दुकानातील सर्व वस्तू स्वच्छ कराव्या लागतील. ग्राहकांसाठी टोकन सिस्टम किंवा अपॉईंटमेंट सिस्टम लागू केली जाईल.

सलून मध्ये या गोष्टींची काळजी घ्या-

सलून, पार्लरमध्ये डिस्पोजेबल टॉवेल किंवा पेपर वापरला जावा. प्रत्येक ग्राहकानंतर ३० मिनिटांकरता वस्तू स्वच्छ करा.
ताप, सर्दी, खोकला असलेल्यांना प्रवेश देऊ नये. मास्कशिवाय कोणालाही आत येऊ देऊ नये.
एंट्री पॉईंटवर ग्राहकांसाठी सॅनिटायझर असणे आवश्यक आहे. संपूर्ण स्टाफने मास्क घालावे. हेड कव्हर आणि ऍप्रन आवश्यक.

ग्राहकांसाठी डिस्पोजेबल टॉवेल किंवा पेपरचा वापर करावा लागेल.
प्रत्येक ग्राहकानंतर ३० मिनिटांसाठी वस्तू स्वच्छ करा.
प्रत्येक कटिंग आणि शेविंगनंतर स्टाफने स्वत:ला स्वच्छ करावे.

 

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like