‘कोरोना’मुळे देशात सुमारे 200 डॉक्टरांनी गमावलाय जीव, IMA ने PM मोदींकडे केली ‘ही’ विनंती

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  कोरोना व्हायरस महामारीमुळे देशात आतापर्यंत 196 डॉक्टरांचा जीव गेल आहे. यापैकी बहुतांश जनरल प्रॅक्टिशनर आहेत. इंडियन मेडिकल असोसिएशन (आयएमए) ने शनिवारी ही माहिती देत पीएम मोदींना याकडे लक्ष देण्याची विनंती केली.

कोरोनाविरूद्धच्या लढाईत आपले प्राण पणाला लावणार्‍या डॉक्टरांच्या सुरक्षेबाबत चिंता व्यक्त करत आयएमएने म्हटले, आयएमएने एकत्र केलेल्या डाटानुसार, आपल्या देशाने 196 डॉक्टर गमावले आहेत, ज्यामध्ये 170 डॉक्टर 50 पेक्षा जास्त वयाचे होते. यापैकी 40 टक्के जनरल प्रॅक्टिशनर होते.

आयएमएने म्हटले की, संक्रमित डॉक्टरांची संख्या वाढत चालली आहे. प्रत्येक दिवशी अनेक डॉक्टर जीव गमावत आहेत. यामध्ये मोठ्या संख्येने जनरल प्रॅक्टीशनर आहेत. कारण बहुतांश लोक ताप आणि अशाप्रकारच्या लक्षणानंतर जनरल प्रॅक्टिशनरशी संपर्क साधतात, यामुळे सर्वप्रथम ते संपर्कात येतात.

पंतप्रधान नरेंद मोदी यांना लिहिलेल्या पत्रात आयएमएने विनंती केली आहे की, डॉक्टर आणि त्यांच्या कुटुंबियांची योग्य देखभाल करण्यात यावी आणि सर्व सेक्टरच्या डॉक्टरांना सरकारकडून उपचार आणि आयुर्विमा विमा संरक्षण दिले जावे.

आयएमएचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. राजन शर्मा म्हणाले, आयएमए देशभरात साडेतीन लाख डॉक्टरांचे प्रतिनिधित्व करते. हा उल्लेख करणे आवश्यक आहे की, कोविड-19 सरकारी आणि खासगी सेक्टर असा भेदभाव करत नाही आणि सर्वांना समान प्रभावित करतो.

ते म्हणाले, यापेक्षा जास्त निराशजनक आहे की, डॉक्टर आणि त्यांच्या कुटुंबियांना भरती होण्यासाठी बेड मिळत नाहीत आणि बहुतांश प्रकरणात औषधांच्या कमतरतेचा सामना करावा लागत आहे. आयएमए भारत सरकारला विनंती करत आहे की, महामारी दरम्यान, डॉक्टरांची सुरक्षा आणि कल्याणाकडे योग्य लक्ष दिले जावे. आयएमएचे महासचिव डॉ. आर. व्ही. अशोकन म्हणाले, कोविड – 19 मुळे डॉक्टरांचा मृत्यूदर भयंकर स्थितीत पोहचला आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like