खुलासा ! भारताला पुन्हा ‘हादरा’ देण्याच्या तयारीत ‘जैश-ए-मोहम्मद’, बालाकोटमध्ये 27 आतंकवाद्यांना दिली जातेय ‘ट्रेनिंग’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पाकिस्तानमधल्या बालाकोट येथील दहशतवादी तळावर भारताना मागील वर्षी Airstrike केला होता. या घटनेला एक वर्ष पूर्ण होत असतानाच पुन्हा एकदा एक धक्कादायक माहिती समोर आली. या तळावर जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेकडून दहशतवाद्यांना प्रशिक्षण देण्यात येत आहे. या तळावर 27 दहशतवाद्यांचा एक ग्रुप प्रशिक्षण घेऊन तयार असून तो भारतात दहशतवादी हल्ले घडवून आणू शकतो अशी शक्यता गुप्तचर सूत्रांनी व्यक्त केलीय. या तळांवर होत असलेल्या हालचालींवर भारताच्या सुरक्षा यंत्रणेकडून लक्ष ठेवून आहे. भारताच्या सुरक्षा यंत्रणेकडून कोणत्याही स्थितीला तोंड देण्यासाठी लष्कर सज्ज असल्याची माहिती सूत्रांनी दिलीय.

वर्षभरापूर्वी केलेल्या हवाई हल्ल्यामध्ये 200 ते 300 दहशतवादी मारले गेल्याचा अंदाज व्यक्त केला जात होता. पाकव्याप्त काश्मीरमध्ये बालाकोट असून तिथल्या पर्वतांवर जैश-ए-मोहम्मद तर्फे हे प्रशिक्षण तळ चालवले जातात. पुलवामा हल्ल्यानंतर भारताने धाडसी कारवाई करत हे तळ उध्दवस्त केले होते. त्यानंतर दोन्ही देशांमध्ये प्रचंड तणाव निर्माण झाला होता.

मागील वर्षी फेब्रुवारीमध्ये जम्मू-काश्मीरच्या पुलवामामध्ये सीआरपीएफच्या ताफ्यावर दहशतवादी हल्ला केला होता. या हल्ल्यानंतर भारताने एअर स्ट्राईक करून भारतीय वायुसेनेने जैश-ए-मोहम्मदच्या तळांवर बॉम्ब हल्ला करून हि ठाकाणे उद्धवस्त केली. या कारवाईनंतर काही महिने शांत राहिल्यानंतर पाकिस्तानने पुन्हा हे तळ सुरु केल्याची माहिती सुरक्षा यंत्रणेकडे आहे. जैशचा म्होरक्या मैलाना मसुद अजहर याचा पुतण्या युसूफ अजहर हा हे ट्रेनिंग कॅम्प सांभाळत असून त्यानेच 27 दहशतवाद्यांना ट्रेनिंग दिलय.

पाकव्याप्त काश्मीर आणि अफगाणिस्तानमधील दहशतवादी यामध्ये सहभागी आहेत. त्यांना छुप्या पद्धतीने करावयाचे हल्ले आणि दहशतवादी कारवायांचे प्रशिक्षण या ठिकाणी दिले जातेय. पाकिस्तानी लष्कराचं या दहशतवादी गटांना संरक्षण असून त्यांच्याकडूनही त्यांना प्रशिक्षण देण्यात असल्याची माहिती आहे.