खुशखबर ! जानेवारी 2020 पासुन केंद्र आणि राज्य सरकारच्या कर्मचार्‍यांच्या DA मध्ये 4 % वाढ ‘निश्चित’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था- जानेवारी 2020 पासून महागाई भत्त्यामध्ये (डीए) चार टक्के वाढ झाली आहे. याचा केंद्र सरकारचे 1 कोटी कर्मचारी आणि निवृत्ती वेतनधारकांसह अन्य राज्यांमधील कर्मचार्‍यांना लाभ होणार आहे. महागाई भत्ता 17 वरून 21 टक्के होणार आहे.

यासंदर्भात यूपी-टीईटी उत्तीर्ण शिक्षक महासंघाचे अध्यक्ष अनुराग सिंह आणि एजी ऑफिस ब्रदरहुडचे माजी अध्यक्ष व सिटिजन्स ब्रदरहुडचे अध्यक्ष हरी शंकर तिवारी यांनी सांगितले की, नोव्हेंबर महिन्याचा मुल्य निर्देशांक 328 झाला आहे. आता डिसेंबरच्या निर्देशांकात 12 अंकांची कपात झाल्याने डीए चार टक्क्यांनी कमी होईल. परंतु, एवढी मोठी कपात मागील दिड दशकात झाली नाही. यासाठी चार टक्के वाढ होणार आहे. सध्या 17 टक्के महागाई भत्ता मिळत आहे. यासाठी 4 टक्के वाढ होईल. परंतु, जानेवारी 2020पासूनच्या डीएच्या वाढीची अधिकृत घोषणा फेब्रुवारी 2020 मध्ये केली जाईल.

नव्या वर्षात 232 परिषदेच्या शिक्षकांना एरियरची भेट
परिषदेच्या प्राथमिक शाळांमध्ये 68500 शिक्षक भरतीद्वारे निवडलेल्या 232 सहाय्यक शिक्षकांना नवीन वर्षात एरियरची भेट मिळाली आहे. पायाभूत शिक्षण अधिकारी संजय कुमार कुशवाह यांनी 30 जानेवरीला एरियरचे पैसे देण्याचे आदेश दिले आहेत. या शिक्षकांची नियुक्ती सप्टेंबर 2018 मध्ये झाली होती. पडताळणीनंतर त्यांना वेतनाची रक्कम 28 फेब्रुवारी 2019 नंतर दिली होती. या आदेशामुळे शिक्षकांना सव्वा दोन लाख रूपयांपर्यंतचा एरियर मिळणार आहे.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/

मधुमेह असल्यास आहारामध्ये करा ‘या’ ४ पदार्थांचा समावेश
‘हे’ ७ उपाय केल्यास सतत येणारा थकवा जाईल पळून, जाणून घ्या
जेवण पॅक करण्यासाठी ‘फॉईल पेपर’ वापरता ? ‘हे’ ७ दुष्परिणाम जाणून घ्या
मासिक पाळीत स्वच्छता राखण्यासाठी ‘या’ ६ गोष्टी लक्षात ठेवा !
गूळ खाण्याने वाढते वजन, जास्त खाण्याचे ‘हे’ ६ तोटे जाणून घ्या
मातेच्या स्तनपानामुळे बाळांना होतात ‘हे’ ६ फायदे, जाणून घ्या
लवंग खाण्याचे ‘हे’ ६ आरोग्यदायी फायदे तुम्हाला माहीत आहेत का ?