पालघरमध्ये एका घरात तांत्रिकासह 50 लोकांची सुरू होती काहीतरी ‘भानगड’? पोलिसांनी छापा टाकून केलं 27 जणांना अटक

पालघर : पोलीसनामा ऑनलाइन –  पालघर जिल्ह्यात पोलिसांनी एका घरावर छापा टाकला. त्यामध्ये एका तांत्रिकासह अनेकांना अटक केली. या ठिकाणी आजारी लोक बरे होण्यासाठी मोठ्या संख्येने एकत्रित आले होते. पोलिसांना याची माहिती मिळाल्यानंतर ही कारवाई केली.

विक्रमगड तहसीलच्या सकतोर गावातील एका घरात शुक्रवारी दुपारी पोलिसांनी छापेमारीची कारवाई केली. पोलिसांनी याबाबत सांगितले, की त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या 25 लोकांनी मास्क लावला नव्हता. त्यामुळे त्यांच्याकडून 12,500 रुपयांचा दंड आकारण्यात आला. आम्हाला एक गुप्त माहिती मिळाली. त्याआधारे जिल्हा ग्रामीण पोलिसांनी घरावर छापेमारीची कारवाई केली. त्याठिकाणी काळ्या जादूटोणासारखे प्रकरणे दिसत होती. घटनास्थळी महिलांसह 50 लोक एकत्र होते.

दरम्यान, छापेमारी सुरु असताना अनेकांनी घटनास्थळावरून पळ काढला. मात्र, पोलिसांनी तांत्रिक आणि घरमालकासह 27 लोकांना पकडले. पोलिसांनी तांत्रिक आणि घरमालकाला नंतर अटक केली. पण इतक्या मोठ्या प्रमाणात काय सुरु होते, याचा तपास पोलिसांकडून केला जात आहे.