65 % लोक PM नरेंद्र मोदींबाबत ‘समाधानी’, नवीन पटनायक बनले लोकप्रिय मुख्यमंत्री : सर्व्हे

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सध्या संपूर्ण देश कोरोना विषाणूशी लढा देत आहे आणि लॉकडाऊन व्यतिरिक्त केंद्र सरकार यासाठी वेगवेगळी पावले उचलत आहे. दरम्यान, सरकारच्या कारभारावर लोक खूष आहेत का, हे पाहण्यासाठी सर्वेक्षण करण्यात आले. सी व्होटर द्वारे करण्यात आलेल्या सर्वेक्षणानुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना 65 टक्के लोकांनी समर्थन दिले आहे. तर ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनाईक हे देशातील सर्व मुख्यमंत्र्यांमध्ये सर्वाधिक लोकप्रिय मुखमंत्री आहेत. ‘सर्वात मोठे, निश्चित आणि स्वतंत्र सर्वेक्षण’, ‘स्टेट ऑफ द नेशन 2020 : मे’ या नावाच्या संशोधन संस्थेने सर्वेक्षण केले आहे. याला देशातील प्रत्येक राज्य आणि केंद्र शासित प्रदेशातील 3000 पेक्षा अधिक लोकांनी प्रतिक्रिया नोंदवल्या आहेत.

पंतप्रधान मोदींची लोकप्रियता
नुकत्याच आपल्या दुसऱ्या कार्यकाळातील पहिला वर्धापन दिन साजरा करणाऱ्या नरेंद्र मोदी यांना सर्वेक्षणात 65 टक्के जनतेचा पाठिंबा मिळाला. ओडिशाने मोदींच्या कामगिरीसाठी 95.6 गुण दिले आहेत. त्यानंतर हिमाचल प्रदेश 93.95 आणि छत्तीसगडने 92.73 गुण दिले आहेत. देशभरात करण्यात आलेल्या सर्वेक्षणामध्ये 58.83 लोका पंतप्रधान मोदी यांच्या कामगिरीवर समाधानी आहेत. तर 20.04 लकांनी म्हटले आहे की ते काहीसे समाधानी आहेत. आणि उर्वरित 16.71 लोक अजिबात समाधानी नाहीत. सर्वोच्च पदाच्या शर्यतीत नरेंद्र मोदी हे आवडते नेते म्हणून उदयास आले आहेत.

सर्वाधिक लोकप्रिय मुख्यमंत्री
सर्वेक्षणात असे दिसून आले आहे की, उत्कृष्ट मुख्यमंत्री होण्याच्या शर्यतीत ओडिशाचे नवीन पटनाईक, छत्तीसगडचे भूपेश भागेल आणि केरळचे पिनाराय विजयन यांच्या स्पर्धा होती. या सर्वात कमी लोकप्रिय मुख्यमंत्र्यांमध्ये हरियाणेचे मनोहर लाल खट्टर, उत्तराखंडचे टी.एस. रावत आणि पंजापचे अमरिंदर सिंह यांचा समावेश आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
W3Schools
You might also like