स्वातंत्र्य दिनी PM मोदींनी लाल किल्ल्यावर फडकवला तिरंगा, ‘कोरोना’ योध्यांना केले ‘नमन’ !

नवी दिल्ली : वृत्त संस्था – भारत आज आपला 74वा स्वातंत्र्य दिवस साजरा करत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऐतिहासिक क्षणी लाल किल्ल्यावर तिरंगा फडकवला. तत्पूर्वी पंतप्रधानांनी राजघाटावर जाऊन राष्ट्रपिता महात्मा गांधींना श्रद्धांजली अर्पण केली. समारंभ स्थळी पोहचल्यावर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी पीएम मोदींचे स्वागत केले.

यावेळी देशाला संबोधित करताना मोदी म्हणाले, कोरोनाच्या या संकट काळात सेवा परमो धर्म: च्या भावनेसह आपल्या जीवाची पर्वा न करता आपले डॉक्टर्स, नर्स, पॅरामेडिकल स्टाफ, अ‍ॅम्ब्युलन्स कर्मचारी, सफाई कर्मचारी, पोलीस कर्मचारी, अनेक लोक चोवीस तास काम करत आहेत, त्यांना मी नमन करतो.

आपल्या संबोधनात पीएम मोदींनी कोरोना योद्धांना नमन करत म्हटले की, देश विशेष स्थितीतून मार्गक्रमण करत आहे. अशावेळी आपल्याला संकल्प करणे खुप आवश्यक आहे.