‘कोरोना’ला घाबरण्याची आवश्यकता नाही, लवकरच पूर्ण होतील एका कोटी ‘टेस्टींग’ : आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –    केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी म्हटले की, देशात कोरोना व्हायरसला घाबरण्याची आवश्यकता नाही. त्यांनी गुरूवारी सांगितले की, देशात लवकरच एक कोटी कोरोना टेस्टींगचा आकडा पूर्ण होईल.

डॉ. हर्षवर्धन यांनी म्हटले की, आम्ही अजूनपर्यंत 91 लाख कोरोना चाचण्या केल्या आहेत. लवकरच एक कोटीचा आकडा गाठणार आहोत. या सर्व आकड्यांवरून दिसते की भारत कोरोना व्हायरसशी मजबूतीने लढत आहे आणि त्यामध्ये यशदेखील येत आहे.

आरोग्य मंत्री म्हणाले, देशातील लोकांनी घाबरण्याची आवश्यकता नाही, 135 कोटी लोकांच्या देशात प्रकरणांची संख्या सहा लाख आहे. या सहा लाख लोकांपैकी 3 लाख 60 हजार लोक रिकव्हर होऊन घरी गेले आहेत. भारतात मृत्यूदर जगाच्या तुलनेत सर्वात कमी 2.94 टक्के आहे.

ते म्हणाले की, रिकव्हरी रेट 60 टक्के आहे आणि 21-22 दिवसातच तो दुप्पट होत आहे. आपण मोठ्याप्रमाणात टेस्टींग करत आहोत. काल आम्ही देशात सुमारे 2 लाख 30 हजार टेस्ट केल्या. या प्रवासाची सुरूवात एका प्रयोगशाळेतून झाली होती, आज आम्ही देशात 1,065 प्रयोगशाळी विकसित केल्या आहेत.

त्यांनी म्हटले की, देशातील लोकांना 118 लाख पीपीई किट वितरित करण्यात आले आहेत. तर 195 लाख एन -95 मास्क वितरित केले आहे. पहिल्या दिवसांपासून आम्ही पायाभूत सुविधा मजबूत करण्याचा प्रयत्न केला होता. अजूनही आम्ही केलेल्या तयारीचा पूर्णपणे वापर झालेला नाही.