लग्नाच्या एक दिवस अगोदर वराच्या मोबाईलवर पोहोचली ‘वधू’ची अश्लील छायाचित्रे, उडाली खळबळ

वाराणसी : वृत्तसंस्था – वाराणसीत लग्नाच्या एक दिवस अगोदर वधूच्या मोबाईल फोनवर वधूची न्यूड छायाचित्रे पोहोचल्याने खळबळ उडाली. वराने लग्नास नकार दिला. यामुळे लग्नाची तयारी तशीच राहिली. घरातील वातावरण एकदम बदलले. वधूच्या मोठ्या बहिणीने तिच्याच एका नातेवाईकाविरूद्ध तक्रार दाखल केली आहे. पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत. वाराणसीत गंगेच्या पलीकडे असलेल्या रामनगरच्या रामपूर वॉर्डातील एका मुलीचे लग्न मऊ येथील एका युवकाशी होणार होते. हे लग्न रविवारी २८ जून रोजी होणार होते. अनेक दिवसांपासून घरात तयारी सुरू होती. अनेक कार्यक्रम देखील पूर्ण झाले होते. संगीताचे वातावरण होते. आता फक्त वरात येण्याची वाट पहात होते.

दरम्यान शनिवारी सायंकाळी वराच्या मोबाईलवर काही न्यूड फोटो आले. ते फोटो पाहिल्यावर नवरदेवाला मोठा धक्का बसला. फोटो त्याच्या भावी पत्नीचे होते. आधी त्याने घरातील सदस्यांना त्या फोटोंबद्दल सांगितले आणि त्यानंतर मुलीच्या कुटुंबाशी बोलणे झाले. लग्नाला नकार देत नवरदेवाने वरात आणण्यास नकार दिला. ते ऐकताच मुलीच्या घरात खळबळ उडाली. आनंदाचे वातावरण शांतीत बदलले. मुलीच्या मोठ्या बहिणीने आपल्याच एका नातेवाईकाला दोषी सांगत पोलिसात तक्रार दिली आहे. पोलिसांना सांगितले की, तिच्या एका बहिणीचे लग्न अहरोरा गावात झाले आहे. बहीण येथे आल्याने सर्वात धाकट्या बहिणीची ओळख चुलत भाऊ दीपक याच्याशी झाली.

नंतर दीपक रामनगरमधील त्यांच्या घरीही येऊ लागला. एके दिवशी दीपकने तिच्या बहिणीला फिरण्याच्या बहाण्याने घेऊन गेला आणि अश्लील व्हिडिओसह तिचे फोटो काढले. वधूच्या बहिणीच्या म्हणण्यानुसार, त्यांना छायाचित्रांविषयी माहिती मिळताच कुटुंबातील लोकांनी दीपकशी संवाद साधल्यावर त्याने शिवीगाळ करण्यास सुरवात केली. पोलिसांनी दीपकविरूद्ध विविध कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे. रामनगरचे प्रभारी निरीक्षक नरेश कुमार सिंह यांनी सांगितले की, दीपक आधीच विवाहित आहे. त्याने कोणत्या कारणासाठी हे फोटो नवरदेवाला पाठवले, हे समजण्यापलीकडे आहे. दीपकला लवकरच अटक करुन चौकशी केली जाईल आणि तुरूंगात पाठवले जाईल.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
W3Schools
You might also like