67 वर्षांचा पती आणि 52 वर्षांची पत्नी, लग्नाच्या 3 महिन्या नंतर झालं…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – महिला समुपदेशन कौटुंबिक केंद्रावर गुरुवारी झालेल्या सुनावणीदरम्यान, महिला पोलिस स्टेशनमध्ये एका 67 वर्षीय वृद्धाने नवीन पत्नीविरूद्ध तक्रार केल्यावर सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. वृद्धाने तीन महिन्यांपूर्वी 52 वर्षीय महिलेशी ‘प्रेम विवाह’ केले होते.

पत्नी लग्नाच्या दोन महिन्यानंतर घरात ठेवलेले दागिने आणि रोख रक्कम घेऊन आपल्या माहेरी गेली होती. वृद्धाला आधीच चार विवाहित मुले आणि पत्नीला देखील दोन विवाहित मुले आहेत. दोन महिन्यांपूर्वी पत्नीने देखील पती विरोधात पोलिसांकडे मारहाण केल्याची तक्रार नोंदवली होती.

तीन महिन्यांपूर्वी दोघांचा प्रेम विवाह झाला होता. विजय (67) आणि पूनम (52) (बदललेली नावे ) विजयच्या पत्नीचा आधीच मृत्यू झालेला होता आणि पूनमच्या घटस्फोट झालेला होता. विजयला पहिल्या पत्नीकडून चार मुले आहेत ज्यांचे लग्न झालेले आहे. त्यातच पूनमला एक मुलगा आणि मुलगी आहे आणि त्यांचाही विवाह झालेला आहे. दोघेही आपल्या मुलांपासून वेगळे राहतात.

सुनावणी दरम्यान विजयने पत्नीला कोणतीही शिक्षा नको असे सांगत पत्नीने माहेरी नेलेले दागिने आणि रोख रक्कम देण्याची मागणी केली आहे. तर पत्नीने विजय आपल्याला नेहमी मारहाण करत असल्याचे सांगितले तसेच विजयच्या मुलांकडूनही आयुष्यात हस्तक्षेप होत असल्याचे म्हंटले आहे. यावर काउंसलर यांनी सुनावणीची पुढील तारीख दिलेली आहे.

नातं वाचवण्यासाठी प्रयत्न
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या ठिकाणी आलेल्या सर्व जोडप्यानं काउंसलर समजावण्याचा प्रयत्न करतात आणि सुनावणीच्या वेळी अनेक कुटुंबाला वेगळे होण्यापासून वाचवण्याचा प्रयत्न करतात. जोपर्यंत नाते टिकू शकते असे वाटत असते तोपर्यंत सुनावणीसाठी पुढील तारीख दिली जाते.

98 जोडप्याना समजावण्याचा प्रयत्न केला
गुरुवारी 98 तक्रारींवर सुनावणी झाली, यामध्ये सात काउंसलरकडून सगळ्या जोडप्याना समजावण्याचा प्रयत्न करण्यात आला. परंतु केवळ चारच जोडप्यांच्या तक्रारींवर निवाडा होऊ शकला. काउंसलर विधु गर्ग यांनी सांगितले की जे जोडपे एक मेकांसमोर झुकण्यास नकार देते त्यांच्यातच छोट्या छोट्या गोष्टींवरून वाद होतात आणि पुढे हेच वाद न्यायालया पर्यंत जातात.

Visit : Policenama.com 

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like