अभिनेता मनोज तिवारींना ‘नारळ’, आदेश गुप्ता बनले दिल्ली भाजपाचे नवे अध्यक्ष

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाने मोठे बदल केले आहे. मनोज तिवारी यांना दिल्ली भाजप अध्यक्षपदावरून दूर केले आहे. त्यांच्या जागी आता आदेश कुमार गुप्ता यांना दिल्ली भाजपच्या अध्यक्षपदाची कमांड देण्यात आली आहे. यासंदर्भात पक्षाचे सरचिटणीस अरुण सिंग यांनी अधिकृत पत्रक जारी केले आहे.

याशिवाय छत्तीसगडचे भाजप अध्यक्षही हटविण्यात आले आहेत. त्यांच्या जागी विष्णुदेव साय यांना प्रदेशाध्यक्ष करण्यात आले आहे. मणिपूरमध्ये देखील नवीन प्रदेशाध्यक्षांची नेमणूक करण्यात आली आहे. आता मणिपूर भाजपची कमांड एस. टिकेंन्द्र सिंह यांच्याकडे देण्यात आली आहे. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांच्या सुचनेवरून तीनही राष्ट्रीय अध्यक्षांची घोषणा करण्यात आली.

का केले बदल ?
दिल्ली आणि छत्तीसगडमधील विधानसभा निवडणुकीत भाजपला पराभवाला सामोरे जावे लागले. दिल्लीमध्ये भाजपला आम आदमी पार्टीकडून मोठ्या पराभवाचा सामना करावा लागला. तर छत्तीसगडमध्ये झारखंड मुक्ती मोर्चा आणि काँग्रेस आघडीने भाजपचा पराभव केला. यानंतर दोन्ही राज्यांच्या भाजप प्रमुखांना हटवण्याची मागणी झाली होती.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
W3Schools
You might also like