योगी सरकार अ‍ॅक्शनमध्ये ! बोगस उर्दू शिक्षकांकडून करणार 35 लाखांची ‘वसूली’

जौनपूर : मोअल्लिम डिग्रीधारी आठ बोगस उर्दू शिक्षकांच्या विरोधात गुन्हा दाखल होताच राज्य शासनाने कारवाईस सुरूवात केली आहे. पोलिसांच्या अटकेपासून दूर असलेल्या बोगस शिक्षकांकडून वेतन म्हणून घेतलेल्या सव्वा कोटी रूपयांपैकी पहिला हप्ता म्हणून 35 लाख 21 हजार 294 रुपयांच्या वसूलीसाठी पहिली नोटीस एडीएम (प्रशासन) ने मंगळवारी जारी केली आहे. महसूल विभागाच्या माध्यमातून पोलिसांच्या उपस्थितीत होणार्‍या या वसूली नोटीसमध्ये स्पष्ट निर्देश आहे की, जर या बोगस शिक्षकांनी वेतन म्हणून घेतलेली रक्कम लवकर परत केली नाही तर त्यांच्या संपत्तीसह त्यांची अन्य संसाधने सुद्धा सार्वजनिकरित्या लिलाव करण्यात येतील.

उत्तर प्रदेश सरकारच्या विशेष निर्देशावर जिल्हा प्रशासनाकडून करण्यात येत असलेल्या या कारवाईने जिल्ह्यातील सर्व बोगस शिक्षकांमध्ये खळबळ उडाली आहे. आतापर्यंत जिल्ह्याच्या इतिहासात पायाभूत शिक्षण विभागात जितक्या बोगस नियुक्त्या झाल्या आणि त्यांचा खुलासा झाल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला, परंतु आजपर्यंत कोणत्याही बोगस शिक्षकाकडून कोणतीही वसूली करण्यात आलेली नाही.

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या निर्देशांवर जिल्हाधिकारी दिनेश कुमार सिंह यांच्या अध्यक्षतेखाली एडीएम अर्थ आणि महसूल रामप्रकाश यांच्या नेतृत्वात या वसूलीसाठी विशेष पथक स्थापन करण्यात आले आहे. पायाभूत शिक्षण विभागाने शिक्षकांकडून वेतन म्हणून घेण्यात आलेल्या रक्कमेपैकी प्रथम हप्ता म्हणून 35 लाख 21 हजार 294 रुपयांची नोटीस तयार करून जिल्हा प्रशासनाकडे सोपवली आहे.

जिल्ह्यातील ज्या आठ बोगस शिक्षकांकडून वसूली करण्यात येणार आहे, त्यांच्यामध्ये सुइथाकला विकासखंडच्या प्राथमिक विद्यालय वाल्मिकीपूरमध्ये कार्यरत सदाबृज यादव आहे. तो आजमगढमध्ये मेंहनगर क्षेत्रातील पकडीडी रानीपुर पोस्ट डीहाचा रहिवाशी आहे.

प्राथमिक विद्यालय जमदरामध्ये तैनात राजाराम सिंह वाराणसीच्या रोहनिया क्षेत्रातील गाजापुर गाव, पोस्ट बभनियांवचा रहिवाशी आहे. प्राथमिक विद्यालय पूरा असालत खांमध्ये कार्यरत नरसिंह यादव जौनपुरमध्ये सुजानगंज क्षेत्रातील गाव खेमपुर करौराचा रहिवशी आहे. शाहगंज ब्लॉकमधील उर्दू प्राथमिक विद्यालय जमदहा खेतासरायमध्ये कार्यरत रामप्यारे यादव, जौनपुरमधील जलालपुर क्षेत्रात गाव खेवनसीपुर चा रहिवाशी आहे.

रामपुर ब्लॉकमधील प्राथमिक विद्यालय सरायडीह येथे तैनात दीपचंद यादवचे दोन पत्ते नोंदण्यात आले आहेत. एका पत्त्यात त्याने सरायख्वाजा क्षेत्राच्या जेठपुराचा रहिवाशी असल्याचे सांगितले आहे, तर दुसर्‍या अस्थाई पत्त्यात लखनऊमधील आलमबागयेथील रेल्वे कॉलनी स्लीपर ग्राऊंड 10 ए, टाईप-तीन येथील रहीवाशी असल्याचे म्हटले आहे.

बीबीपुरमध्ये तैनात राकेश चंद यादव शाहगंज क्षेत्रातील खुटहन ब्लॉकमध्ये गाव मडवाचा रहिवाशी आहे. मुफ्तीगंज विकासखंडातील प्राथमिक विद्यालय मुरकीमध्ये तैनात राजबहादुर यादव वाराणसीमध्ये चोलापुर क्षेत्राच्या गाव कटारी सिंहुलियाचा रहिवाशी आहे. महाराजगंज विकासखंडमधील प्राथमिक विद्यालय लोकापुरमध्ये कार्यरत शिक्षिका सिम्मी सिंहचे दोन पत्ते आहेत. एक पत्ता सिकरारा क्षेत्रातील ककोहिया रिठी गावचा तर दुसरा पत्ता बक्शा क्षेत्रातील गाव बसारथपुर पोस्ट साधनपुर येथील आहे.

अर्थ आणि महसूलचे एडीएम राम प्रकाश म्हणाले की, शासनाच्या निर्देशांवर जनपदच्या आठ बोगस उर्दू शिक्षकांकडून वसूलीची नोटीस तयार केली आहे. यासाठी संबंधित पोलीस ठाण्याचे पोलीस आणि महसूल विभागाचे पथक संयुक्त कारवाई करणार आहे. देय रक्कमेची वसूली न झाल्यास बोगस शिक्षकांच्या संपत्तीचा लिलाव करण्यात येईल.