अबब ! ४४२ रुपयांच्या केळ्यांनंतर आता १७०० रुपयांची दोन अंडी !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – चंदीगडमधील जेडब्ल्यू मॅरियटमधील ४४० रुपयाच्या दोन केळ्यांचे प्रकरण ताजे असताना आता पुन्हा असेच एक प्रकरण समोर आले आहे. तुम्हाला जर ते दोन केळे खूप महाग वाटले असतील तर आता तुम्ही दोन अंड्यांची किंमत ऐकून चक्कर येऊन पडाल अकारण मुंबईतील एका हॉटेलमध्ये एका व्यक्तीने ऑर्डर केलेल्या दोन उकडलेल्या अंड्यांसाठी चक्क १७०० रुपये लावण्यात आले आहेत.

अभिनेता राहुल बोस याच्या दोन केळ्याच्या प्रकारानंतर आयकर विभागाने जेडब्ल्यू मॅरियटवर २५ हजार रुपयांचा दंड ठोठावला होता. त्यानंतर आता ट्विटर युझर कार्तिक धर याने एक बिल ट्विट केल्यानंतर हि माहिती समोर आली आहे. या ट्विटमध्ये त्याने त्या हॉटेलचे नाव कॅप्शनमध्ये टाकत म्हटलं कि, @FourSeasons मध्ये दोन उकडलेल्या अंड्यांसाठी १७०० रुपये. त्याचबरोबर त्याने अभिनेता राहुल बोस याला टॅग देखील केले. त्यावर त्याने लिहिले की, भावा आंदोलन करायचे का ? त्याचबरोबर या बिलामध्ये दोन ऑम्लेटसाठी देखील १७०० रुपये घेण्यात आले आहेत. कार्तिक हा लेखक असून त्याने अनेक पुस्तके लिहिली आहेत. त्यावर विविध नागरिकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एकाने म्हटले कि, या अंड्याबरोबर सोने देखील आले होते का ? तर एकाने ट्विट करत म्हटले कि, कोंबडा श्रीमंत घरचा असेल.

दरम्यान, मागील महिन्यात अभिनेता राहुल बोस हा चंदीगढमधील जेडब्ल्यू मॅरियट थांबला असताना त्याने दोन केळे ऑर्डर केले होते. त्यानंतर त्याला दोन केळ्यांचे ४४२ रुपये बिल देण्यात आले होते. त्यानंतर त्याने तक्रार केल्यानंतर जेडब्ल्यू मॅरियट हॉटेलवर आयकर विभागाने २५ हजार रुपयांचा दंड ठोठावला होता.

आरोग्यविषयक वृत्त

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like