मोदी सरकारच्या कारवाईनं घाबरला ‘ड्रॅगन’, भविष्यवाणी करत म्हणाला – ‘2024 मध्ये जिंकण्याची आशा कमी’

नवी दिल्ली :  वृत्तसंस्था –   पूर्व लडाखमधील अनेक महिन्यांच्या चिनी कुरघोड्यानंतर मोदी सरकारने अ‍ॅप्सवर बंदी घातल्यामुळे ड्रॅगन चवताळला आहे. अलिकडच्या पहिल्या तिमाहीच्या जीडीपी दरापासून ते विविध विषयांवर चीनने आवाज उठविला आहे. तसेच शेजारील देशाने असा अंदाज वर्तविला आहे की 2024 मध्ये मोदी सरकार पुन्हा विजयी होण्याची आशा खूपच कमी आहे.

चीन सरकारचे मुखपत्र ‘ग्लोबल टाईम्स’ ने एक लेख लिहिला आहे की एप्रिल ते जून या पहिल्या तिमाहीत जीडीपीच्या वाढीच्या दरात 23.9 टक्क्यांनी घट झाली आहे, जी की जी-20 देशातील सर्वात मोठ्या घसरणींपैकी एक आहे. तथापि, हे संपूर्ण जगाला ठाऊक आहे की ज्यामुळे भारत, अमेरिकेसह अनेक देशांच्या जीडीपीमध्ये घट झाली आहे, त्यामागे चीनपासून जगभर पसरलेला कोरोना विषाणूच आहे. कोरोना विषाणूमुळे लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे देशाचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे.

चीनने या लेखात म्हटले आहे की पंतप्रधान नरेंद्र मोदींवर खूप दबाव येत आहे. यावर्षी भारतीय अर्थव्यवस्था 10 टक्क्यांनी घसरण्याची शक्यता आहे. त्याच वेळी, कोट्यावधी लोक दारिद्र्य रेषेखाली जाऊ शकतात. लेखानुसार, 2024 मध्ये पंतप्रधान मोदी तिसऱ्यांदा विजयी होण्याची अपेक्षा कमी होत आहे, कारण मोठ्या संख्येने भारतीयांनी व्यवसाय आणि नोकर्‍या गमावल्या आहेत. तसेच, कोरोना विषाणूचा कहर भारतात सुरूच आहे.

अ‍ॅप्सवर बंदी घातल्यामुळे देखील संतापला चीन

विविध स्तरावर भारताकडून धक्का बसलेल्या चीनला अ‍ॅप्स बंदीमुळेही दुःख झाले आहे. चीन म्हणाला, ’15 जून रोजी गलवान खोऱ्यामध्ये झालेल्या हिंसक संघर्षानंतर भारताने 59 चिनी अ‍ॅप्सवर बंदी घालण्याची घोषणा केली होती. यामुळे दोन्ही देशांचे आर्थिक सहकार्य विखुरले आहे. कोरोना विषाणूपासून बचाव करण्याचे अपयश लपवण्यासाठी नवी दिल्लीने चीनशी असलेले संबंध खराब केले. असा विश्वास आहे की भारताच्या अर्थव्यवस्थेला आणखी एक धक्का बसणार आहे.’

रागाच्या भरात चीनने आणखी काय लिहिले?

‘ग्लोबल टाईम्स’ च्या लेखात पुढे असेही म्हटले गेले आहे की काही वर्षांपूर्वी भारत हा जगातील वेगाने विकसित होणार्‍या अर्थव्यवस्थांपैकी एक होता. विकास दर 7 टक्क्यांहून अधिक होता, परंतु 2017 नंतर वेग कमी होऊ लागला. उदाहरणार्थ, गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये कारच्या विक्रीत 33 टक्क्यांनी घट झाली होती, जी दोन दशकांतील सर्वात मोठी घसरण होती. अशा परिस्थितीत पंतप्रधान मोदींसमोर आव्हाने आता वाढत आहेत.