UP : ‘ईद’च्या नमाजासाठी ‘मशिद’ उघडण्याच्या प्रकरणात उच्च न्यायालयाचा ‘हस्तक्षेप’ करण्यास ‘नकार’

प्रयागराज : वृत्तसंस्था – अलाहाबाद उच्च न्यायालयाने ईद-उल-फितरच्या सामूहिक नमाज व प्रार्थनेसाठी राज्यातील ईदगाह व मशिद उघडण्याच्या मागणीवर हस्तक्षेप करण्यास नकार दिला आहे आणि जूनमध्ये नमाज पठण करण्यास परवानगी देण्याचे आदेश जारी करण्यास नकार दिला आहे. न्यायालयाने म्हटले आहे की, याचिकार्कत्याने आपल्या मागणीसाठी सक्षम अधिकाऱ्यासमोर अहवाल सादर करावा. कोणताही आदेश नसल्यास किंवा अहवाल प्रलंबित ठेवला असल्यास याचिकाकर्ता उच्च न्यायालयात याचिका दाखल करू शकतो.

हा आदेश मुख्य न्यायाधीश गोविंद माथुर आणि न्यायमूर्ती सिद्धार्थ वर्मा यांच्या खंडपीठाने दिला आहे. शाहिद अली सिद्दीकी यांनी सरन्यायाधिशांना लिहलेल्या पत्रावर जनहित याचिका निकाली काढताना हा आदेश दिला. आदेश जारी करण्यासाठी याचिकाकर्त्याने आपली मागणी सरकारसमोर ठेवावी, असे कोर्टाने म्हटले आहे.

कोर्टाने पुढे म्हटले आहे की, कोणताही आदेश किंवा अयोग्य आदेश दिल्यानंतर याचिका दाखल केली जाऊ शकते. याचिकाकर्त्यांने आपली मागणी सरकारकडे न नेता जनहित याचिका दाखल केली असून आदेश जारी करण्याची मागणी केली आहे. यावर कोर्ट हस्तक्षेप करू शकत नाही.