आश्चर्य ! ‘त्यांनी’ चोरलेली सोन्याची चैन ‘कुरियर’ने केली परत, पत्र पाठवून म्हणाले ‘असं’ काही

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – राजस्थानच्या अलवरमध्ये एक चकित करणारी घटना समोर आली आहे. १८ जुलै रोजी एका सोनाराला एक पत्र आले. या पत्रात दोन सोन्याच्या चैन आणि माफीनाफा लिहिला होता. महेश नावाच्या या व्यक्तीने ते पात्र लिहिले असून यामध्ये त्याने चुकीने चैन घेऊन गेल्याबद्दल माफी मागितली आहे.

या पत्रात त्याने लिहिले होते कि, मी सोन्याच्या चैन परत करण्यासाठी तुमच्या दुकानावर आलो होतो, मात्र दुकानावर पोलीस असल्याने मी परत गेलो. तुमचा पत्ता सापडल्यानंतर मी तुम्हाला कुरियरच्या माध्यमातून या चैन परत करत आहे. तुम्ही मला मनापासून माफ कराल अशी आशा आहे.

योगेश गोयल नावाच्या व्यक्तीने २५ जुलै रोजी ३५ ग्रॅम वजनाच्या दोन सोन्याच्या चैन चोरीला गेल्याची तक्रार पोलिसांमध्ये दाखल केली होती. त्यांनी सांगितले कि, त्यांच्या दुकानावर तीन लोकं चांदीचे छत्र घेण्यासाठी आले होते. त्यांनी यासाठी ५ हजार ६०० रुपये दिले. त्याचदरम्यान त्यांनी दोन सोन्याच्या चैन देखील चोरल्या. त्यानंतर आम्ही पोलिसांना सूचना देऊन सीसीटीव्ही फुटेज देखील पाहिले.

अलवरचे पोलीस अधीक्षक अनिल देशमुख यांनी म्हटले कि, आरोपींची ओळख पटवली असून त्यांनी या गुन्ह्यात वापरलेली गाडी देखील जप्त केली आहे. एका आरोपीला अटक करण्यात अली असून हे आरोपी गुरुग्राममधील आहेत. त्यांच्या घरावर धाड टाकली असता ते घरी मिळवून आले नाहीत.

दरम्यान, पोलीस अधीक्षकांनी याआरोपीच्या माफीनाम्यावर बोलताना सांगितले कि, हे हृदय परिवर्तनचे प्रकरण नसून अटक टाळण्यासाठी केलेले नाटक आहे. जर त्यांना चैन परत करायची होती तर त्यांनी यासाठी २३ दिवसांचा कालावधी का लावला. त्याचबरोबर त्यांच्याविरोधात आमच्याकडे मजबूत पुरावा असून या कुरियरचा आमच्या तपासावर काहीही परिणाम होणार नाही.

आरोग्यविषयक वृत्त –