अमिताभ बच्चनच्या ‘प्रतीक्षा’ बंगल्यात पावसाचे पाणी (व्हिडिओ)

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूड सुपरस्टार अमिताभ बच्चन यांच्या घरात पाणी घुसल्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अमिताभ बच्चनचे चाहते घरात सर्व काही ठीक आहे की नाही असा प्रश्न विचारत आहेत. चाहते  अमिताभ बच्चन यांच्या उत्तराची वाट पाहत आहेत.

अमिताभ बच्चन मुंबईच्या पावसामुळे बेहाल  झाले आहेत. कारण जुहू परिसरातील त्यांच्या  प्रतीक्षा बंगल्यातही पाणी शिरले आहे. जिथे त्यांचे घर आहे तो रस्ता  पूर्णपणे पाण्याखाली गेला आहे.

अमिताभ बच्चन अयान मुखर्जीच्या ‘ब्रह्मास्त्र’ चित्रपटात दिसणार आहेत. या चित्रपटात रणबीर कपूर, आलिया भट्ट, मौनी रॉय, डिंपल कपाडिया यांच्या  भूमिका  आहेत. ‘ब्रह्मास्त्रसोबतच ते आयुष्मान खुरानासमवेत ‘गुलाबो-सीताबो’ मध्ये दिसणार आहे.  कौन बनेगा करोडपती’ च्या येणाऱ्या नव्या सीझनमुळे बॉलिवूड सुपरस्टार अमिताभ बच्चन सध्या चर्चेत आहेत. 9 ऑगस्टपासून कौन बनेगा करोडपती’ चे 11 वे सीझन सुरु झाले आहे. या शोने काही आठवड्यांत टीआरपीच्या पहिल्या पाचमध्ये स्थान मिळविले आहे. मागील हंगामाप्रमाणे हा हंगामही हिट ठरणार आहे.