‘बिग बी’ अमिताभनं आजच्या तरूणाईविषयी केलं ट्विट, म्हणाले – ‘गरजेचं नाही की सन्मान पाया पडूनचं करावा’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन सोशल मीडियावर खूप अ‍ॅक्टिव असतात. सोशल मीडियावर, अमिताभ हे केवळ चित्रपटांशी संबंधित नाहीत तर सामान्य जीवनातील गोष्टीही शेअर करत असतात. अमिताभ हे वारंवार सोशल मीडियावर आपले मत शेअर करत असतात. अशा परिस्थितीत अमिताभ बच्चन यांनी आजच्या तरूणाईबद्दल ट्विट केले आहे. त्यांचे हे ट्विट खूपच व्हायरल झाले आहे.

अमिताभ बच्चन यांनी ट्विट करुन लिहिले की, ‘आजकाल एखाद्याच्या पायाला स्पर्श करुन त्याचा सन्मान करण्याची गरज नाही. याउलट त्यांना पाहून आपला मोबाइल बाजूला ठेवणे हा एक मोठा सन्मान आहे.’ अमिताभ यांच्या या ट्विटबद्दल त्याचे चाहते त्यांचे कौतुक करत आहेत आणि सतत रिट्वीट करत आपली प्रतिक्रिया देत आहे.

यापूर्वी अमिताभ यांनी एका ट्विटमध्ये लिहिले होते की, ‘नमस्कार हे केवळ आपल्या संस्कृतीचे प्रतीक नाहीत. एक प्रथा किंवा परंपरा ही नाही तर आपला आदर्श आहे. एक प्रकारे ते आपल्या संस्कृतीचा ध्वज आहे.

अमिताभ यांच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे म्हणले तर त्यांचा आगामी चित्रपट ‘झुंड’ चा टीझर नुकताच प्रदर्शित झाला होता. हा टीझर प्रेक्षकांच्या खूप पसंतीस पडला होता. या चित्रपटात अमिताभ हे मुख्य भूमिका साकारत आहे. त्याचबरोबर ते ‘गुलाबो सिताबो’, ‘ब्रह्मास्त्र’ आणि ‘चेहरे’ यांसारख्या चित्रपटात धमाल करताना दिसणार आहे.